Rishabh Pant Record : इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पंतने केला खास रेकॉर्ड, 'ही' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय यष्टीरक्षक
India vs England : बर्मिंगहम येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात पंतने अनेक विक्रम स्वत:च्या नावे केले आहेत.
![Rishabh Pant Record : इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पंतने केला खास रेकॉर्ड, 'ही' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय यष्टीरक्षक Rishabh Pant Test Record India vs England Most Runs Single Test Indian wicketkeeper outside Asia Rishabh Pant Record : इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पंतने केला खास रेकॉर्ड, 'ही' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय यष्टीरक्षक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/04/0fc1f1d44448ff2ce5ea407cc5e8b4f41656936471_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rishabh Pant in India vs England Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात बर्मिंगहम येथे कसोटी सामना सुरु आहे. यामध्ये भारताचा युवा फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याने ठोकलेल्या शतकामुळे पहिल्या डावात सुरुवातीला अडचणीत असलेला संघ नंतर चांगल्या स्थितीत आला. यावेळी सामन्यातील दोन्ही डावात मिळून पंतने तब्बल 203 धावा केल्या असून यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे आशिया खंडाबाहेर एका कसोटीत इतक्या धावा करणारा पंत पहिलाच भारतीय यष्टीरक्षक बनला आहे.
भारतीय कसोटी संघातील एक अत्यंत महत्त्वाचा मागील काही दिवसांत अगदी पाठीचा कणा झालेला असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही, तो खेळाडू म्हणडे यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत. पंतने मागील 1-2 वर्षात काही महत्त्वाच्या सामन्यांत केलेल्य़ा जबरदस्त खेळीमुळे संघाला विजय मिळवून देत स्वत:सह संघाचा मोठा फायदा करुन दिला आहे. यामुळेच तो अनेक रकेॉर्डही नावावर करत असून नुकताच त्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकत तब्बल 203 धावा एकाच कसोटी सामन्यात ते देखील आशिया खंडाच्या बाहेर केल्या आहेत.
एका सामन्यात 203 धावा
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचे एकीकडे आघाडीचे सर्व फलंदाज तंबूत परतत असताना पंतने जाडेजासोबत भारताचा डाव सांभाळला. सोबतच आपलं शतकही पूर्ण करत पुन्हा एकदा कसोटी सामन्यात टी20 प्रमाणे फलंदाजी केली. 89 चेंडूत पंतने शतक पूर्ण केलं. त्याने डावात 111 चेंडूत 20 चौकार आणि 4 षटकार ठोकत 146 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात 86 चेंडूत 8 चौकारांसह 57 धावा केल्या. यामुळे एका सामन्यातील दोन्ही डावात मिळून त्याने 203 धावा स्वत:च्या नावे केल्या आहेत.
हे देखील वाचा-
- Ind vs ENG, Day 4, Innings Highlights : भारताचा दुसरा डाव आटोपला, इंग्लंडसमोर विजयासाठी 378 धावांचे लक्ष्य
- ENG vs IND: पहिल्या टी-20 साठी भारतीय संघात मोठा बदल, व्हीव्हीएस लक्ष्मणकडं मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी
- ENG vs IND: 'भारतानं कितीही धावसंख्या उभारली, तरी आम्ही...' जॉनी बेअरस्टोनं सांगितला इंग्लंडचा पुढचा प्लॅन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)