Ind vs Aus 2nd ODI Team India Playing XI: यशस्वी IN, रोहित OUT...; गंभीर अन् आगरकर मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत?, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाची संभाव्य Playing XI
Ind vs Aus 2nd ODI Team India Playing XI: ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यानंतर आज भारत आणि ऑस्ट्रेलियात दुसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे.

Ind vs Aus 2nd ODI Team India Playing XI: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus 2nd ODI) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 7 विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यानंतर आज (23 ऑक्टोबर) भारत आणि ऑस्ट्रेलियात दुसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाची प्लेईंग इलेव्हन कशी (Ind vs Aus 2nd ODI Team India Playing XI) असेल जाणून घ्या...
भारतीय क्रिकेट संघ सराव करत असताना भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि भारतीय संघाचे मुख्य निवडक अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी सलामीवीर यशस्वी जैस्वालसोबत (Yashasvi Jaiswal) चर्चा केली. रोहित शर्मा (Rohit Sharma) सरावानंतर कोणाशीही बोलला नाही आणि एकटाच हॉटेलमध्ये परतला. यादरम्यान गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांनी यशस्वी जैस्वालशी दीर्घ चर्चा केली, जैस्वालला रोहितची जागा घेण्यासाठी भविष्यात सलामीवीर म्हणून विचारात घेतले जात आहे. त्यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून रोहित शर्माला बाहेरचा रस्ता दाखवत यशस्वी जैस्वालला संधी दिली जाणार असल्याची चर्चा संध्या रंगली आहे.
📍Adelaide Oval 🏟️#TeamIndia in the zone ahead of the 2⃣nd #AUSvIND ODI 💪 pic.twitter.com/3hPrAZuRY5
— BCCI (@BCCI) October 22, 2025
दुसऱ्या सामन्यासाठी भारताची संभाव्य Playing XI: (Team India Playing XI)
यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल (कॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर,अक्षर पटेल, केएल राहुल, नितीशकुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव किंवा वॉशिंग्टन सुंदर
दुसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाची संभाव्य Playing XI: (Australia Playing XI)
मिशेल मार्श (कॅप्टन), ट्रेविस हेड, मार्नस लाबूशेन, जोश इंग्लिस, मिशेल ओन, एलेक्स कॅरी, कूपर कोनोली, जोश हेजलवूड, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, जेवियर बार्टलेट
भारताचा संपूर्ण संघ- (Team India Full Squad)
रोहित शर्मा, शुभमन गिल (कॅप्टन),विराट कोहली, श्रेयस अय्यर,अक्षर पटेल, केएल राहुल, नितीशकुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव , वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जैस्वाल, धृव जुरेल.
ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ- (Australia Full Squad)
मिशेल मार्श (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मार्नस लाबूशेन, जोश इंग्लिस, मिशेल ओन, एलेक्स कॅरी, कूपर कोनोली, जोश हेजलवूड, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, जेवियर बार्टलेट, मॅट रेनशॉ, एडम झम्पा, बेनड्वारशुइस





















