Ind vs Aus 2nd ODI Shubhman Gill VIDEO: ऑस्ट्रेलियात फिरत असताना शुभमन गिलसोबत पाकिस्तानी चाहत्याची नापाक हरकत; जवळ आला अन्...
Ind vs Aus 2nd ODI Shubhman Gill: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिलचा ऑस्ट्रेलियामधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका पाकिस्तानी चाहत्याने नापाक हरकत केल्याचं दिसून येत आहे.

Ind vs Aus 2nd ODI Shubhman Gill: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus ODI Match) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 7 विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यानंतर आज (23 ऑक्टोबर) भारत आणि ऑस्ट्रेलियात दुसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, या सामन्याआधी एक व्हिडीओ समोर आला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिलचा (Shubhman Gill) ऑस्ट्रेलियामधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका पाकिस्तानी चाहत्याने नापाक हरकत केल्याचं दिसून येत आहे. शुभमन गिल अॅडलेडच्या रस्त्यांवर फेरफटका मारत होता. यादरम्यान एक चाहता शुभमन गिलसोबत हस्तांदोलन करण्यासाठी आला. एक चाहता असल्यामुळे शुभमन गिलने देखील त्याच्यासोबत हात मिळवला. परंतु शुभमन गिलने हात मिळवताचा त्या चाहत्याने पाकिस्तान झिंदाबाद असं ओरडला. यावर मात्र शुभमन गिलने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. परंतु शुभमन गिलच्या एका व्हिडीओमुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे.
A Pakistani fan met Shubman Gill in Adelaide and said, "Pakistan Zindabad." 🇵🇰🇮🇳🔥 pic.twitter.com/2NVLpjwFo7
— Cric Passion (@CricPassionTV) October 22, 2025
आज भारत अन् ऑस्ट्रेलिया पुन्हा आमनेसामने येणार- (Ind vs Aus 2nd ODI Match)
भारतीय संघाने पर्थमधील पहिला एकदिवसीय सामना 7 विकेट्सने गमावला. पावसामुळे प्रभावित झालेल्या त्या सामन्यात प्रत्येक डावात 26 षटकांचा समावेश होता. त्यांचा दुसरा एकदिवसीय सामना आज 23 ऑक्टोबर रोजी अॅडलेडमध्ये खेळवला जाईल. ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे आणि मालिकेत टिकून राहण्यासाठी भारताला अॅडलेड एकदिवसीय सामना जिंकावा लागेल. भारतीय संघाने अॅडलेड मैदानावर आतापर्यंत 15 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात नऊ जिंकले आहेत आणि एक बरोबरीत सुटला आहे.
दुसऱ्या सामन्यासाठी भारताची संभाव्य Playing XI: (Team India Playing XI)
रोहित शर्मा, शुभमन गिल (कॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर,अक्षर पटेल, केएल राहुल, नितीशकुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव किंवा वॉशिंग्टन सुंदर
दुसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाची संभाव्य Playing XI: (Australia Playing XI)
मिशेल मार्श (कॅप्टन), ट्रेविस हेड, मार्नस लाबूशेन, जोश इंग्लिस, मिशेल ओन, एलेक्स कॅरी, कूपर कोनोली, जोश हेजलवूड, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, जेवियर बार्टलेट




















