IND vs SA T20 : 'दुसऱ्या टी20 मध्ये दिनेश कार्तिकच्या जागी दीपक हुडाला संधी द्या'; गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य
IND vs SA T20: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेसाठी दिनेश कार्तिकला संधी दिली असून बऱ्याच काळानंतर दिनेश भारतीय संघात परतला आहे.
Gautam Gambhir On Dinesh Karthik : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 5 टी20 सामन्यांची मालिका खेळवली जात असून यासाठी बीसीसीआयने आयपीएलमधील खेळीच्या जोरावर खेळाडूंना संधी दिली आहे. यावेळी अनेक युवा खेळाडूंना संधी दिली असून बऱ्याच खेळाडूंच्या आयपीएलमधील कामगिरीमुळे त्यांची संघात निवड झाली आहे. त्यामुळे भारताचा दिग्गज खेळाडू दिनेश कार्तिकही संघात परतला आहे. त्याने यंदा आरसीबीकडून दमदार फलंदाजी केल्याने त्यांची टीम इंडियात एन्ट्री झाली आहे. पण भारताचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीरने (Gautam Gambhir) आता दिनेशच्या जागी दीपक हुडाला (Deepak Hooda) संधी द्या असं वक्तव्य केलं आहे.
पहिल्या टी20 सामन्यात तब्बल 212 धावाचं आव्हान देऊनही भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. ज्यामुळे आता दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाला आणखी तगडी टक्कर द्यावी लागू शकते. अशामध्ये अंतिम 11 मध्ये काही बदल देखील करावे लागू शकतात, याबद्दलच बोलताना गंभीरने आपली प्रतिक्रिया दिली. त्याने दिनेशच्या जागी दीपक हुडाला संधी देण्याचा सल्ला दिला. तसंच युवा फिरकीपटू रवी बिश्नोईला ही संधी दिली जाऊ शकते, असंही तो म्हणाला.
संभाव्य भारताची अंतिम 11
ईशान किशन, ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, आवेश खान, अर्शदीप सिंह/उमरान मलिक, रवी बिश्नोई.
हे देखील वाचा-
- IND vs SA: मॅच बघायला जाताय की हाणामारी करायला? सामनादरम्यानचा फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ एकदा बघाच!
- कसोटीत 500 विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज कोण? फक्त सात जणांनाचं गाठता आलाय विक्रमी टप्पा
- IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यातच चहलकडे विक्रम करण्याची संधी; घ्याव्या लागतील फक्त 3 विकेट्स