ENG vs IND: बर्मिंगहॅममध्ये एकही कसोटी सामना जिंकू शकला नाही भारत!
ENG vs IND: भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. येत्या 1 जुलै पासून दोन्ही संघात मागील दौऱ्यातील एकमेक कसोटी सामना खेळला जाणार आहे.
ENG vs IND: भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. येत्या 1 जुलै पासून दोन्ही संघात मागील दौऱ्यातील एकमेक कसोटी सामना खेळला जाणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघानं सरावाला सुरुवात केली आहे. हा एकमेक कसोटी सामना बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. महत्वाचं म्हणजे, या मैदानावर भारतीय संघाला आतापर्यंत एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. या मैदानात भारताचा माजी क्रिकेटपटू सुनील गावस्करनं सर्वाधिक धावा केल्या आहे. त्यानंतर या यादीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारताकडं इतिहास रचण्याची संधी
बर्मिंगहॅम येथे भारतानं इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत सात कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी सहा सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागलाय. तर, एक सामना अनिर्णित ठरलाय. या मैदानात अद्यापही भारतानं एकही सामना जिंकला नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वात गेल्या अनेक वर्षाचा विक्रम मोडण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी भारतानं अनेक युवा खेळाडूंना संघात स्थान दिलंय. या खेळाडूंना इंग्लंडविरुद्ध इतिहास रचण्याची संधी उपलब्ध झालीय.
बर्मिंगहॅममध्ये सुनील गावस्करच्या सर्वाधिक धावा
सुनील गावस्कर यांनी बर्मिंगहॅममध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यानं 3 सामन्यात 216 धावा केल्या. यादरम्यान गावस्करनं तीन अर्धशतके झळकावली आहेत. तर, या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीनं एका सामन्यात 200 धावा केल्या आहेत. त्यानं एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलं आहे. सचिन तेंडुलकर तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानं 2 सामन्यात 187 धावा केल्या आहेत. ज्यात एका शतकाचा समावेश आहे.
हे देखील वाचा-