एक्स्प्लोर

SL vs AUS: निसांका- मेंडिस ऑस्ट्रेलियावर पडले भारी, श्रीलंकेची मालिकेत 2-1 नं आघाडी

Australia tour of Sri Lanka: श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला (SL vs AUS) सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं.

Australia tour of Sri Lanka: श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला (SL vs AUS) सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. श्रीलंका- ऑस्ट्रेलिया यांच्यात कोलंबोच्या (Colombo) आर. प्रेमदासा स्टेडियमवर (R.Premadasa Stadium) तिसरा एकदिवसीय सामना खेळण्यात आला. या सामन्यात निसांका (Pathum Nissanka) आणि  कुशल मेंडिसच्या (Kusal Mendis) धमाकेदार खेळीच्या जोरावर  श्रीलंकेच्या संघानं ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्स राखून पराभव केला. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियानं जिंकून पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 आघाडी घेतली. मात्र, त्यानंतर पुढील दोन्ही सामन्यात विजय मिळवून श्रीलंकेनं जोरदार कमबॅक केलं. या मालिकेत श्रीलंकेचा संघ 2-1 नं आघाडीवर आहे. 

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथण फलंदाजीचा निर्णय
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही खास झाली नाही. मात्र अव्वल आणि मधल्या फळीतील फलंदाजांच्या छोट्या खेळीनं ऑस्ट्रेलियाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. कर्णधार आरोन फिंचनं 62 धावांची खेळी खेळली. तर ट्रॅव्हिस हेडनं 70 आणि यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीनं 49 धावा केल्या. दरम्यान, ऑस्ट्रेलियानं 50 षटकात सहा विकेट्स गमावून श्रीलंकेसमोर 292 धावांचं लक्ष्य ठेवलं. श्रीलंकेकडून जेफ्री वँडरसेनं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. 

निसांका- कुशल मेंडिसची धमाकेदार खेळी
दरम्यान, ऑस्ट्रेलियानं दिलेलं 292 धावांचं लक्ष्य श्रीलंकेनं अगदी सहज पार केलं. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ दडपणाखाली असल्याचं जाणवलं नाही. श्रीलंकेची पहिली विकेट 42 धावांवर पडली. मात्र त्यानंतर निसांका आणि मेंडिस यांनी 170 धावांची भागीदारी करत श्रीलंकेच्या विजयाचा पाया रचला. कुशल मेंडिस 87 धावा करून सामन्यातून निवृत्त झाला. दुसरीकडे निसांकानं 137 धावांची खेळी करत श्रीलंकेला विजयाच्या अगदी जवळ आणलं. अखेर श्रीलंकेनं 4 विकेट्स गमावून आणि 9 चेंडू शिल्लक असतानाच लक्ष्य गाठलं.निशांकाला त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरविण्यात आलं.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

On This Day : इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
VVS Laxman News : ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Aus Vs Ban 1st Test : रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
IND vs SL 1st Test : गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?
गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
Embed widget