IND vs SA, Coronavirus | चेंडूला चमकवण्यासाठी खेळाडूंनी कमीत कमी थुंकीचा वापर करावा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये उद्यापासून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. पहिला सामना उद्या दुपारी 1:30 वाजता धर्मशाळा येथे खेळवण्यात येईल. एकीकडे जिथे दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये 3-0 अशी मात देत भारतात दाखल झाला आहे.
नवी दिल्ली : भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सांगितलं आहे की, उद्यापासून सुरू होणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील तीन एकदिवसीय कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये चेंडू चमकवण्यासाठी गोलंदाजांनी कमीत कमी थुंकीचा वापर करावा. सध्या जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी खेळाडूंवर अनेक गोष्टींसाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. याबाबत बोलताना भुवनेश्वरने बोलताना सांगितले की, 'याबाबत निर्णय संघाचे डॉक्टर्स घेणार असून बुधवारपर्यंत याचा निर्णय घेण्यात येईल.'
#CoronaVirus | कोरोनाचा धसका, प्रसिद्ध येरमाळासह राज्यातील अनेक यात्रा, कार्यक्रम रद्द
भुवनेश्वर बोलताना म्हणाला की, 'आम्ही चेंडू चमकवण्यासाठी थुंकीचा वापर करायचा की, नाही? याबाबत आम्ही याबाबत विचार केलेला नाही. परंतु, जर चेंडू चमकवण्यासाठी थुंकीचा वापर केला नाहीतर चेंडू चमकवणार कसा?' तसेच याबाबत बोलताना भुवनेश्वर पुढे म्हणाला की, 'यामुळे आम्ही योग्य पद्धतीने गोलंदाडी करू शकणार नाही आणि नंतर लोक आम्हालाच टार्गेट करतील.' दुखापतीतून सावरल्यानंतर भुवनेश्वर कुमारने पत्रकार परिषदेत बोलताना या सर्व गोष्टींवर भाष्य केलं आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा धोका आतापर्यंत संपूर्ण देशभरात पसरलेला आहे. आतापर्यंत भारतात 40 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. अशातच भारतीय क्रिकेट संघ कोरोनापासून बचाव करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करत असल्याचं भुवनेश्वर कुमारने सांगितलं आहे.
पाहा व्हिडीओ : Coronavirus | राज्यात कोरोनाचे पाच रुग्ण, प्रत्येक जिल्ह्यात यंत्रणा सतर्क : राजेश टोपे
दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क बाउचर यांना आधीपासूनच आपल्या सर्व खेळाडूंना सुचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये खेळाडूंनी कोणासोबतही हस्तांदोलन करू नये. कारण कोरोना व्हायरस हळूहळू संपूर्ण जगभरात पसरत आहे. अशातच कोण कधी कोरोनाच्या विळख्यात अडकेल याबाबत काहीच सांगता येत नाही. त्यामुळे दोन्ही संघाना या एकदिवसीय कसोटी सामन्याच्या मालिकेदरम्यान शक्य तेवढी काळजी घेण्यास सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये उद्यापासून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. पहिला सामना उद्या दुपारी 1:30 वाजता धर्मशाळा येथे खेळवण्यात येईल. एकीकडे जिथे दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये 3-0 अशी मात देत भारतात दाखल झाला आहे. तर भारतीय संघाचा न्यूझीलंडदौरा आटपून भारतात परतला आहे. भारतीय संघाने सर्वात आधी झालेल्या टी20 सामन्यांमध्ये 5-0 असा विजय मिळवला होता. परंतु, त्यानंतर एकदिवसीय सामन्यांमध्ये आणि त्यानंतरच्या कसोटी सामन्यांमध्ये मात्र न्यूझीलंडने भारताला व्हाइट व्हॉश दिला.
संबंधित बातम्या :
Coronavirus | कोरोनाबद्दल हे माहित असायलाच हवं!
Corona Virus | कोरोनातून बऱ्या झालेल्या महिलेच्या अनुभवाची पोस्ट व्हायरल