एक्स्प्लोर

Coronavirus | कोरोनाबद्दल हे माहित असायलाच हवं!

कोरोना काय आहे, तो कसा पसरतो, कोरोनाबाबत समज-गैरसमज काय आहेत? याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनने महत्त्वाची माहिती जारी केली आहे, ती जाणून घेऊया

मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरश: हैदोस घातला आहे. कोरोना व्हायरसने भारतात आधीच शिरकाव केला आहे. आता महाराष्ट्रातही कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. पुण्याच पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये एक दाम्पत्य, त्यांची मुलगी नातेवाईक आणि एका चालकाचा समावेश आहे.

राष्ट्रीय स्तरापासून राज्य पातळीवर कोरोना व्हायरसबाबत जगजागृती केली जात आहे. यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांचेही प्रयत्न सुरु आहेत. कोरोना काय आहे, तो कसा पसरतो, कोरोनाबाबत समज-गैरसमज काय आहेत? याबाबत आयएमएने महत्त्वाची माहिती जारी केली आहे, ती पाहूया.

कोरोना विषाणूची साथ

काय आहे कोरोना? - हा एक विषाणू आहे - तो वेगाने वाढतो - वेगाने एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो आपल्या श्वसन संस्थेला बाधित करतो

कोरोना विषाणू दोन प्रकारे पसरतो

1. रुग्णाच्या खोकल्यातून - रुग्ण खोकल्यावर हवेत तुषार उडतात - हे तुषार रुग्णाकडून हवेत पसरतात - या तुषारातील कणांमध्ये विषाणू असतात - आजूबाजूच्या व्यक्तींनी श्वास घेतल्यावर त्यातून त्याचा संसर्ग होतो

2. वस्तूच्या स्पर्शातून - रुग्णाच्या खोकल्यातून काही तुषार त्यातील विषाणूंसह आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात - त्या वस्तूंना आपल्या हातांचा स्पर्श झाल्यावर ते विषाणू हातांना चिकटतात - त्यानंतर जर हा चेहराला किंवा नाकाला लावले तर ते आपल्या श्वसन मार्गातून जाऊन संसर्ग होतो

आजाराची लक्षणे 1. सर्दी 2. घसा तीव्रपणे दुखणे 3. खोकला 4. ताप 5. श्वास घेण्यास त्रास होणे 6. डोकेदुखी 7. उलट्या आणि जुलाब

धोकादायक लक्षणे 1. तीव्र घसादुखी 2. 38 अंशांपेक्षा जास्त ताप असणे 3. धाप लागणे 4. छातीत दुखणे 5. खोकल्या वाटे रक्त पडणे 6. रक्तदाब कमी होणे 7. नखे निळसर काळी पडणे 8. मुलांमध्ये चिडचिड आणि झोपाळूपणा वाढणे

जास्त धोका कोणाला? 1. गरोदर माता 2. उच्च रक्तदाब 3. मधुमेह 4. मूत्रपिंडाचे विकार 5. कर्करोग 6. दमा 7. जुना व सतत बळावणारा खोकला 8. कर्करोगाचे उपचार चालू असल्यास

आजाराची शंका आल्यास 1. वेळ न दवडता मान्यताप्राप्त डॉक्टरांचा सल्ला घ्या 2. जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन कोरोना विषाणूच्या विधानाची तपासणी करुन घ्या 3. डॉक्टरांनी सांगितल्यास रुग्णालयात त्वरित भरती व्हा 4. ऐकीव माहिती अफवांवर विश्वास ठेवू नका 5. अशास्त्रीय उपचार, भोंदू डॉक्टरांचे उपचार घेऊ नका

आजार टाळण्यासाठी काय कराल? 1. डॉक्टरांच्या सल्ल्याने मास्क वापरा 2. गर्दीची ठिकाणे टाळा चेहऱ्याला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा 3. सॅनिटायझर किंवा साध्या साबण-पाण्याने हात वरचेवर धुवावेत 4. खोकला किंवा शिंका आल्यास तोंडावर रुमाल किंवा टिश्यू पेपर धरावा. 5. टिश्यू लगेच कचरापेटीत टाकून द्यावा. 6. खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर हात धरु नये, त्याऐवजी कोपर वाकवून ते तोंडासमोर धरावेत. 7. ताप आणि खोकला असलेल्या रुग्णाचा सहवास टाळावा 8. तुम्ही या विषाणूने पसरलेल्या साथीच्या भागात प्रवास केला असेल किंवा जर ताप, खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गरज वाटल्यास रुग्णालयात भरती व्हावे 9. प्राण्यांचा सहवास टाळावा. त्यांना स्पर्श करु नये 10. पूर्ण शिजवलेले शाकाहारी/मांसाहारी अन्न खावे. 11. चिकन, मटण प्रमाणित दुकानातूनच घ्यावे 12. तीन लिटर पाणी रोज प्यावे 13. पुरेशी आणि नियमित झोप घ्यावी, जागरणे टाळावीत 14. धूम्रपान टाळावे 15. मद्यपान टाळावे

कोरोनाबाबतचे गैरसमज

1. चिकन अंडी खाऊ नयेत - हे धादांत खोटे आहे - पूर्ण शिजवलेल्या मांसाहारातून कोरोना व्हायरस पसरु शकत नाही - 55 अंशांपेक्षा अधिक तापमानात हा विषाणू जिवंत राहत नाही

2. चीनमधून आयात झालेल्या गोष्टी वापरु नयेत - आयात वस्तूमधून विषाणू पसरत नाही - तरीही शंका आल्यास जंतुनाशक औषधांनी त्या धुवून घ्याव्यात - चीनमधून आयात उपकरणे, रंग, पिचकाऱ्या, पुस्तके यातून कोरोन विषाणू पसरत नाही. - शंका आल्यास निर्जंतुक हॅण्डग्लोव्हज वापरावेत

3. लसूण खाल्ल्याने कोरोना विषाणूंचा संसर्ग होत नाही - हे पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे. - यासाठी कोणतेही संशोधन अस्तित्त्वात नाही - अशा प्रकारची कोणतीही वनस्पती अथवा औषध सध्यातरी शास्त्रीय पद्धतीने मान्यताप्राप्त नाही

4. करुणा विषाणूचा संसर्ग झाल्यास रुग्ण मृत्युमुखी पडतो - आज देशभरात केंद्र सरकारने आणि महाराष्ट्रात राज्य सरकारच्या आरोग्य खात्याने, त्याचप्रमाणे आयएमएच्या सदस्य डॉक्टरांनी अगदी पहिल्या दिवसापासून हा आजार ओळखून, त्याचं निदान त्वरित करुन रुग्णाला आवश्यक असल्यास त्याला इस्पितळात भरती करण्याबद्दल मोहीम राबवली आहे. - विषाणूची बाधा झाली तरी रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. - यात रुग्ण दगावण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

लक्षात ठेवा - कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची शंका आली तरी घाबरु नका - त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या - अफवा आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका - कोरोना विषाणूची साथ लवकरच पूर्णपण आटोक्यात येईल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
Embed widget