(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SA T20 Series : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघाची घोषणा, पण मालिकेचा थरार कधी अन् कुठे रंगणार? जाणून घ्या A टू Z माहिती
IND vs SA T20 Series News : भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर लगेचच दक्षिण आफ्रिकेचा दौरा करायचा आहे.
India vs South Africa T20 Series Date And Venue : भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर लगेचच दक्षिण आफ्रिकेचा दौरा करायचा आहे, जिथे त्यांना 4 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये काही नवे चेहरे पाहायला मिळाले आहेत, तर बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत संघाचा भाग असलेल्या काही खेळाडूंना स्थान मिळालेले नाही. या मालिकेत टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादवच्या हातात आहे. त्याचबरोबर या मालिकेसाठी मयंक यादव आणि रायन पराग यांच्याशिवाय शिवम दुबेची संघात निवड का करण्यात आली नाही याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली.
तसेच, रमणदीप, विजय कुमार या खेळाडूंना प्रथमच संघात संधी मिळाली आहे. या मालिकेसाठी संघ जाहीर झाला आहे. पण ही मालिका कधी होणार? तुमच्यापैकी अनेकांना ही माहिती नसेल. मग जाणून घेऊया मालिकेचे पूर्ण वेळापत्रक. हे सामने कधी आणि कुठे खेळवले जातील?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला 8 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना किंग्समीड येथे, दुसरा सामना सेंट जॉर्ज ओव्हल येथे 10 नोव्हेंबरला, तिसरा सामना 13 नोव्हेंबरला सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर आणि चौथा टी-20 सामना 15 नोव्हेंबरला वांडरर्स स्टेडियमवर खेळवला जाईल. सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून खेळवले जातील. भारतीय संघाची कमान सूर्यकुमार यादवच्या हाती असेल.
हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 मध्ये एकूण 27 सामने खेळले गेले आहेत. या 27 सामन्यांपैकी भारताने 15 तर दक्षिण आफ्रिकेने 11 वेळा विजय मिळवला आहे. 1 सामना कोणत्याही निकालाशिवाय राहिला आहे. भारतीय संघ आघाडीवर आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी टी-20 मालिका कोणता संघ जिंकतो हे पाहणे बाकी आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ (India squad for South Africa T20s) : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई , अर्शदीप सिंग, विजयकुमार वैश, आवेश खान आणि यश दयाल.
हे ही वाचा -
Ind vs NZ: टीम इंडियाला विजयसाठी 359 धावांचं आव्हान; दुसऱ्या कसोटी सामन्यात कोण मारणार बाजी?