Babar Azam: बाबर आझमचं कसं होणार? विराटचा कोणता विक्रम मोडलाय हे त्यालाच माहिती नाही!
पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हे आधुनिक युगातील सर्वोत्तम फलंदाज मानले जातात.
T20 International Cricket: पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हे आधुनिक युगातील सर्वोत्तम फलंदाज मानले जातात. सध्या विराट कोहलीची बॅट शांत असून बाबर आझम तुफान फॉर्ममध्ये आहे. नुकताच बाबर आझमनं विराट कोहलीचा टी-20 क्रमवारीत सर्वाधिक दिवस अव्वल स्थानी राहण्याचा विक्रम मोडलाय. या विक्रमाबाबत पत्रकारांनी बाबरला विचारलं. त्यावेळी त्यानं पत्रकारांनाच कोणता विक्रम असा प्रश्न केला.
बाबर आझम काय म्हणाला?
दरम्यान, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी बाबर आझमनं पत्रकार परिषेद घेतली. त्यावेळी पत्रकारानं बाबर आझमला दोन प्रश्न विचारचे आहेत, असं सांगितलं. नुकताच तुम्ही विराट कोहलीचा मोडलाय, असं बोलत पत्रकारानं प्रश्नास सुरुवात केली, तोच बाबर आझम म्हणाला की, कोणता विक्रम? त्यानंतर पत्रकार पुढे म्हणाला की, तुम्ही सर्वात जास्त काळ टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी राहण्याचा विक्रम आपल्या नावावर केलाय. यावर बाबरनं ठिक आहे असं उत्तर दिलं.
व्हिडिओ-
Babar Azam’s EPIC Reply to ‘You Broke Another Virat Kohli Record’ Goes VIRAL #BabarAzam pic.twitter.com/Zl6tPTnJwM
— Vikash Gaur (@thevikashgaur) July 5, 2022
बाबरनं विराटचा कोणता विक्रम मोडलाय?
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक दिवस अव्वल स्थानी राहण्याचा विक्रम बाबर आझमच्या नावावर नोंदवला गेलाय. या आधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. बाबरनं टी-20 फॉरमॅटमध्ये नंबर वन फलंदाज म्हणून 1028 दिवसांपेक्षा अधिक काळ घालवलाय.
बाबर आझम तुफान फॉर्ममध्ये!
बाबर आझम हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्येही पहिल्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टॉप-10 मध्ये स्थान मिळवणारा बाबर हा एकमेव फलंदाज आहे. बाबर आझमला नुकतेच कसोटी क्रिकेटमध्ये चौथे स्थान मिळालं आहे. केन विल्यमसन सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. ज्यामुळं त्याची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. या यादीत जो रूट अव्वल स्थानी आहे. त्यानंतर मार्नस लॅबुशेन दुसऱ्या तर, स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हे देखील वाचा-
- ENG vs IND: बर्मिंगहॅम कसोटीत धक्कादायक प्रकार, इंग्लंडच्या प्रेक्षकांचं भारतीयांशी गैरवर्तन!
- ENG vs IND: भारताच्या हातातून सामना निसटतोय, मालिका विजयाच्या आशा धूसर, बेअरस्टो- रूटनं बिघडवला खेळ!
- Rishabh Pant : तब्बल 49 वर्षानंतर असा योगायोग! एकाच सामन्यात शतकासह अर्धशतक करण्याची भारतीय यष्टीरक्षकाची किमया