(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rishabh Pant : तब्बल 49 वर्षानंतर असा योगायोग! एकाच सामन्यात शतकासह अर्धशतक करण्याची भारतीय यष्टीरक्षकाची किमया
India vs England : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील बर्मिंगहम कसोटी सामन्यात भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने दमदार खेळ दाखवला आहे.
Rishabh Pant in India vs England Test : भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) पुन्हा एकदा दमदार फॉर्ममध्ये दिसत असून भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील बर्मिंगहम येथे सुरु कसोटी सामन्यात त्याने अनेक रेकॉर्ड्स केले आहेत. यावेळी पंतने दोन्ही सामन्यात भारतीय संघाचा डाव सावरत शतक आणि अर्धशतक ठोकच दोन्ही डावात मिळून तब्बल 203 धावा केल्या. दरम्यान एकाच सामन्यात शतक आणि अर्धशतक ठोकण्याची किमया त्याने केल्याने 49 वर्षानंतर एका भारतीय यष्टीरक्षकाने अशी कमाल केली आहे. याआधी 1973 मध्ये फारुख इंजीनीयर यांनी अशी कामगिरी केली होती.
भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकत तब्बल 203 धावा एकाच कसोटी सामन्यात केल्या. त्याने पहिल्या डावात 146 तर दुसऱ्यात 57 धावा केल्या असून याआधी भारतीय संघात अशी कामगिरी केवळ एकाच यष्टीरक्षक फलंदाजांने म्हणजे फारुख इंजीनीयर यांनी केली होती. विशेष म्हणजे त्यांनीही इंग्लंडमध्येच 1973 रोजी इंग्लंड संघालविरुद्ध ही कमाल केली होती.
पंतने ठोकल्या 203 धावा
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचे एकीकडे आघाडीचे सर्व फलंदाज तंबूत परतत असताना पंतने जाडेजासोबत भारताचा डाव सांभाळला. सोबतच आपलं शतकही पूर्ण करत पुन्हा एकदा कसोटी सामन्यात टी20 प्रमाणे फलंदाजी केली. 89 चेंडूत पंतने शतक पूर्ण केलं. त्याने डावात 111 चेंडूत 20 चौकार आणि 4 षटकार ठोकत 146 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात 86 चेंडूत 8 चौकारांसह 57 धावा केल्या. यामुळे एका सामन्यातील दोन्ही डावात मिळून त्याने 203 धावा स्वत:च्या नावे केल्या आहेत.
हे देखील वाचा-
- ICC : यंदाच्या आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठी दोन इंग्लंडच्या तर एका न्यूझीलंडच्या खेळाडूला नामांकन
- Rishabh Pant Record : इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पंतने केला खास रेकॉर्ड, 'ही' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय यष्टीरक्षक
- Ind vs ENG, Day 4, Innings Highlights : भारताचा दुसरा डाव आटोपला, इंग्लंडसमोर विजयासाठी 378 धावांचे लक्ष्य