66 व्या वर्षी भारतीय माजी क्रिकेटपटू करणार दुसरं लग्न, नवरी 28 वर्षांनी लहान, हळदीचे फोटो व्हायरल
Arun Lal Marriage : भारतीय माजी क्रिकेटपटू अरुण लाल यांचं लग्न सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यांची होणारी पत्नी आणि त्यांच्या वयात 28 वर्षांचा फरक आहे.
Arun Lal Marriage : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कमेंटेटर अरुण लाल (Arun Lal) वयाच्या 66 व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहेत. बंगाल रणजी संघाचे प्रशिक्षक अरुण लाल यांनी भारतासाठी 12 कसोटी आणि 13 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांची होणारी पत्नी बुलबुल साहा (Bulbul Saha) 38 वर्षांची आहे. दोघांच्या वयात 28 वर्षांचा फरक आहे. अरुण लाल आणि बुलबुल 2 मे रोजी कोलकातामध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या दोघांची लग्नपत्रिका आणि हळदीचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
अरुण लाल आणि बुलबुल बऱ्याच काळापासून ओळखतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दोघांच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती यांचा विवाह पार पडणार आहे. अरुण आणि बुलबुल यांचा एका महिन्याआधी साखरपुडा झाल्याची माहिती आहे. नुकताच यांचा हळदी समारंभ पार पडला याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरुण यांच्या पहिल्या पत्नी रीना आजारी आहेत. त्यांना या लग्नाबद्दल माहिती असून अरुण यांच्या दुसऱ्या लग्नामुळे त्या खूश आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या काही सदस्यांव्यतिरिक्त फक्त अरुण लाल आणि बुलबुलचे जवळचे मित्र या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.
Watch out the pre-wedding pics of former India opener and current Bengal Coach Arun Lal and Bulbul Saha#twitter #preweddingshoot #arunlal #bulbul pic.twitter.com/UiTvXrIHNT
— XtraTime (@xtratimeindia) April 25, 2022
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
