Coronavirus Cases India : देशात गेल्या 24 तासांत 2,927 नवे कोरोनाबाधित, 32 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,927 नवे रुग्ण आढळले आहेत. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढताना पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत 2,927 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच मंगळवारी दिवसभरात 2,252 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 16 हजार 279 झाली आहे. काल 2,483 नवीन रुग्णांची नोंद झाली. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 16 हजार 279
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 16 हजार 279 इतकी झाली आहे. मंगळवारी दिवसभरात देशात 2,252 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 23 हजार 654 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 25 हजार 563 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे.
आतापर्यंत 188 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या
देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 188 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. मंगळवारी दिवसभरात देशात 21 लाख 97 हजार 82 कोरोना लसी देण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 188 कोटी 19 लाख 40 हजार 971 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.
COVID-19 | India reports 2,927 fresh cases and 2,252 recoveries, in the last 24 hours. Active cases 16,279
— ANI (@ANI) April 27, 2022
Daily positivity rate (0.58%) pic.twitter.com/bUGouzeoSX
महत्त्वाच्या इतर बातम्या :