1983 World Cup : विश्वचषक जिंकण्याचं मोठं आव्हान सर केलं, तरीही कपिल देव यांना दोन गोष्टींची खंत कायम
Kapil Dev : 1983 चा विश्वचषक भारतीय संघाने जिंकला. पण या आनंदानंतरही आजवर दोन गोष्टींची खंत कायम कर्णधार कपिल देव यांच्या मनात राहिली.
![1983 World Cup : विश्वचषक जिंकण्याचं मोठं आव्हान सर केलं, तरीही कपिल देव यांना दोन गोष्टींची खंत कायम After Winning 1983 World Cup Captain Kapil dev shares Some sad memories of 83 World cup about sunil gavaskar and sunil valson 1983 World Cup : विश्वचषक जिंकण्याचं मोठं आव्हान सर केलं, तरीही कपिल देव यांना दोन गोष्टींची खंत कायम](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/2/2016/04/10160332/Kapil-Dev-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kapil Dev about 1983 World Cup : भारतीय संघासाठी पहिला वहिला विश्वचषक अर्थात 1983 चा विश्वचषक(1983 World Cup). उद्या (25 जून) या विजयाला 39 वर्षे पूर्ण होणार असून हा कप जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी जे केलं ते अगदी स्वप्नवत होतं. संघाचं दमदार नेतृत्त्व करणाऱ्या कपिल यांनी योग्यवेळी दमदार खेळीही केली. पण आजही या सर्वानंतर भारताचे दिग्गज माजी कर्णधार कपिल देव यांना दोन गोष्टीची खंत कायम राहिली आहे. काही महिन्यांपूर्वी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांनी ही खंत सांगितली होती.
1983 विश्वचषकाच्या सुरुवातीपासून भारतीय संघाने एक वेगळी चमकदार कामगिरी करण्यास सुरुवात केली होती. पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजला मात देत आत्मविश्वास कमालीचा वाढलेल्या भारतीय संघाने नंतर सलग दोन सामने गमावूनही पुनरागमन करत विश्वचषक जिंकला. यावेळी कर्णधार कपिल यांनी उल्लेखणीय कामगिरी केली. पण त्यांना या विजयाबद्दल विचारलं असता आनंद तर खूप होता पण दोन गोष्टींची खंतही होती. तर यातील पहिली गोष्ट म्हणजे तत्कालीन संघात 14 खेळाडू होते. यामध्ये दुखापत आणि खराब फॉर्म यामुळे 14 पैकी 13 खेळाडूंना आलटून-पालटून खेळण्याची संधी मिळाली. पण एक खेळाडू सुनील वॉल्सन यांना मात्र एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.
गावस्करांना अर्धशतक करता आलं नाही...
याशिवाय दुसरी खंत म्हणजे भारताचे स्टार फलंदाज सुनील गावस्कर यांना दुखापत आणि खराब फॉर्ममुळे संपूर्ण स्पर्धेत एकही अर्धशतक झळकावता आलं नाही. इतके भारी खेळाडू असूनही त्यांना एकही अर्धशतक झळकावता न आल्याने वाईट वाटतं. या दोन गोष्टींची खंत कपिल यांना आजही असल्याचं त्यांनी स्वत: सांगितलं.
हे देखील वाचा-
- ENG vs IND : ठरलं! इंग्लंड दौऱ्यासाठी रोहितसोबत सलामीला शुभमन गिल, बीसीसीआयने स्वत:च पोस्ट केला VIDEO
- ENG vs NZ : तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, अँडरसनच्या जागी नवा खेळाडू करणार डेब्यू
- ENG vs IND : इंग्लंडविरुद्ध कसोटीत भारतासमोर 'ही' दोन आव्हानं सर्वात अवघड, फलंदाजीत रुट तर गोलंदाजीत ऑली, पाहा आकडेवारी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)