(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ENG vs IND : इंग्लंडविरुद्ध कसोटीत भारतासमोर 'ही' दोन आव्हानं सर्वात अवघड, फलंदाजीत रुट तर गोलंदाजीत ऑली, पाहा आकडेवारी
ENG vs IND : भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांसाठी सज्ज झाला आहे. यामध्ये सुरुवातीलाच होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात जो रुट आणि ऑली रॉबिनसन भारतासाठी मोठं आव्हान असतील.
IND vs ENG Test Match : भारतीय क्रिकेट संघ (Team India) 1 जुलैपासून इंग्लंडविरुद्ध सामने खेळणार आहे. यावेळी सर्वात आधी 1 ते 5 जुलै कसोटी सामना खेळवला जाणार असून त्यानंतर टी20 आणि अखेर एकदिवसीय सामने खेळवले जातील. दरम्यान या सामन्यांसाठी भारतीय संघ सराव करत असून इंग्लंडतर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. तर नेदरलँडविरुद्ध एकदिवसीय सामनेही इंग्लंडचा दुसरा ग्रुप खेळत आहे. दरम्यान कसोटी सामन्याचा विचार करता भारतासाठी इंग्लंडचे दोन खेळाडू एक मोठं आव्हान ठरु शकतात. ते म्हणजे फलंदाजीत जो रुट तर गोलंदाजीत ऑली रॉबिनसन. याचे कारण भारत आता खेळणार असलेल्या एकमेव कसोटी सामन्यातील आधीच्या चार सामन्यांचा विचार करता या दोघांनीच भारतीय संघाविरोधात सर्वात चांगलं प्रदर्शन केलं होतं. तर नेमकं हे प्रदर्शन कसं होतं ते पाहूया...
सर्वात जास्त धावा : इंग्लंडकडून जो रूट त्याने चार सामन्यात 564 रन केले. तर दुसऱ्या क्रमांकावर भारताचा रोहित शर्मा 368 रनांसह आहे.
सर्वात जास्त बँटिंग अॅव्हरेज : यातही जो रूट अव्वल. 94 चं बँटिंग अॅव्हरेज त्याचं असून दुसऱ्या नंबरवर रोहित शर्मा 52.57 च्या बँटिंग अॅव्हरेजने आहे.
सर्वोच्च स्कोर : यातही जो रूट टॉपवर आहे. त्याने 180 धावांची खेळी केली असून भारताचा केएल राहुल 129 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक शतकं : याबाबतीतही जो रूट अव्वल नंबरवर त्याने मालिकेत तीन शतकं ठोकली असून दुसऱ्या स्थानावर केएल राहुल आणि रोहित शर्मा प्रत्येकी एका शतकासह आहे.
सर्वाधिक विकेट्स : यातही इंग्लंडचाच खेळाडू ऑली रॉबिनसन अव्वल आहे. त्याने चार सामन्यात 21 विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर जसप्रीत बुमराह 18 विकेट्स घेत विराजमान आहे.
कधी होणार सामने?
इंग्लंड आणि भारत यांच्यात 1 ते 5 जुलै रोजी एकमेव कसोटी होणार असून त्यानंतर खालीलप्रमाणे सामने पार पडणार आहेत.
इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 7 जुलै | एजेस बाउल |
दुसरा टी-20 सामना | 9 जुलै | एजबॅस्टन |
तिसरा टी-20 सामना | 10 जुलै | ट्रेंट ब्रिज |
इंग्लंड- भारत एकदिवसीय मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 12 जुलै | ओव्हल |
दुसरा एकदिवसीय सामना | 14 जुलै | लॉर्ड्स |
तिसरा एकदिवसीय सामना | 17 जुलै | मँचेस्टर |
हे देखील वाचा-