ENG vs IND : ठरलं! इंग्लंड दौऱ्यासाठी रोहितसोबत सलामीला शुभमन गिल, बीसीसीआयने स्वत:च पोस्ट केला VIDEO
ENG vs IND : भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांसाठी सज्ज झाला असून या सामन्यांत सर्व वरिष्ठ खेळाडू मैदानात उतरणार आहेत.
![ENG vs IND : ठरलं! इंग्लंड दौऱ्यासाठी रोहितसोबत सलामीला शुभमन गिल, बीसीसीआयने स्वत:च पोस्ट केला VIDEO Shubhman Gill be opener along with rohit sharma for England vs India series says bccis intsagram video ENG vs IND : ठरलं! इंग्लंड दौऱ्यासाठी रोहितसोबत सलामीला शुभमन गिल, बीसीसीआयने स्वत:च पोस्ट केला VIDEO](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/20/413198493bbcb275c12ec5e499703981_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ENG vs IND : भारतीय क्रिकेट संघ (Team India) आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिका अनिर्णीत सुटल्यानंतर आता भारत आयर्लंड दौऱ्यावर जाईल. पण त्यानंतर लगेचच वरिष्ठ खेळाडूंच्या उपस्थितीत संघ इंग्लंड विरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी20 सामने खेळताना दिसेल. दरम्यान या महत्त्वाच्या सामन्यांपूर्वीच भारतीय संघाला एक मोठा झटका बसला. संघाचा सलामीवीर आणि महत्त्वाचा फलंदाज केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे या सामन्यांना मुकणार हे जवळपास निश्चित झालं आहे. दरम्यान राहुलला पर्याय कोण? हा प्रश्न सर्वांनाच पडला असताना आता ही जागा युवा फलंदाज शुभमन गिल (Shubhman Gill) घेणार हे दिसून येत आहे. या मागील कारण म्हणजे बीसीसीआयने पोस्ट केलेला एक व्हिडीओ. बीसीसीआयने अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये शुभमन आणि रोहित दोघे सराव करत असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये बीसीसीआयने भारतीय सलामीवीर असं लिहिल्याने आता शुभमनच सलामीला उतरेल हे फिक्स झाल्याचं दिसत आहे.
विशेष म्हणजे शुभमनने याआधी देखील रोहितसोबत सलामीला आल्याचं पाहायाला मिळालं आहे. त्यात यंदा आयपीएल 2022 विजेत्या गुजरात टायटन्स संघाकडूनही शुभमनने चांगली कामगिरी केली. त्याने 16 सामन्यात 483 धावा केल्या. 96 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. याशिवाय सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीतही तो पाचवा राहिला. दरम्यान या सर्वामुळे रोहितसोबत शुभमनच सलामीला उतरण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला असावा.
पाहा व्हिडीओ -
View this post on Instagram
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.
इंग्लंड आणि भारत यांच्यात 1 ते 5 जुलै रोजी एकमेव कसोटी होणार असून त्यानंतर खालीलप्रमाणे सामने पार पडणार आहेत.
इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 7 जुलै | एजेस बाउल |
दुसरा टी-20 सामना | 9 जुलै | एजबॅस्टन |
तिसरा टी-20 सामना | 10 जुलै | ट्रेंट ब्रिज |
इंग्लंड- भारत एकदिवसीय मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 12 जुलै | ओव्हल |
दुसरा एकदिवसीय सामना | 14 जुलै | लॉर्ड्स |
तिसरा एकदिवसीय सामना | 17 जुलै | मँचेस्टर |
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)