Ranveer Singh Movie 83 : 5,10, 15 कोटी नव्हे, रणवीर सिंहला 83 सिनेमासाठी कोटीच्या कोटी, डोळे विस्फारायला लावणारी रक्कम
Ranveer Singh New Movie 83 Income : रणवीरच्या चाहत्यांना असा प्रश्न पडला असेल की, रणवीरने या चित्रपटासाठी किती मानधन घेतले? जाणून घेऊयात 83 चित्रपटासाठी रणवीरने किती मानधन घेतले...
Ranveer Singh New Movie 83 Income : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) 83 या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पण रणवीरच्या चाहत्यांना असा प्रश्न पडला असेल की, रणवीरने या चित्रपटासाठी किती मानधन घेतले? जाणून घेऊयात 83 चित्रपटासाठी रणवीरने किती मानधन घेतले...
रिपोर्टनुसार, रणवीरने 83 या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी 20 कोटी रूपये मानधन घेतलं आहे. असं म्हटलं जात आहे की, रणवीरने मानधनाबरोबरच 83 चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये हिस्सा देखील मागितला आहे. पण याबाबत चित्रपट निर्मात्यांनी अजून कोणतीही माहिती दिली नाही.
कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीरने केली अशी तयारी
एका मुलाखतीमध्ये रणवीरने सांगितले की, कपिल देव यांची भूमिका साकारणं त्याच्यासाठी अत्यंत चॅलेंजिंग होतं. रणवीरने त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिलं. 6 महिने त्याने तयारी केली. रणवीर दिवसातील 4 तास मैदानावर क्रिकेटची प्रॅक्टिस करत होता. सिंम्बा चित्रपटासाठी रणवीरने वजन वाढवले होते. त्यामुळे 83 चित्रपटासाठी त्याला वजन कमी करावे लागले. दररोज 2 तास तो जिममध्ये वर्कआऊट करत होता. एका रिपोर्टनुसार, चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीर काही दिवस कपिल देव यांच्या घरी जाऊन त्यांचे बारकाईने निरीक्षण करत होता.
View this post on Instagram
चित्रपटात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना यांच्याही भूमिका आहेत. दीपिका या चित्रपटाची सहनिर्माती आहे. हा सिनेमा 24 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला.
संबंधित बातम्या
Alia Bhatt Ranbir Wedding : आलिया-रणबीरच्या लग्नाची तारीख ठरली? 'या' ठिकाणी होणार शाही विवाह सोहळा?
Bollywood Stars Real Name : कियारा, अमिताभ बच्चन अन् शिल्पा; बॉलिवूड कलाकारांची खरी नावं माहितीयेत?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha