CWG 2022 Boxing : भारताचा पाकिस्तानवर विजयी 'पंच', बॉक्सर शिव थापाकडून सुलेमान बलोच पराभूत, 5-0 ने मिळवला विजय
Commonwealth Games 2022 : इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे आजपासून कॉमनवेल्थ खेळांना सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी भारताचा बॉक्सर शिव थापाने पाकिस्तानच्या सुलेमान बलोचला पराभूत केलं आहे.
Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 (Commonwealth Games 2022) इंग्लंडमध्ये सुरु झाली असून भारतीय खेळाडू स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी उत्तम लयीत असल्याचं दिसत आहे. भारताचा बॉक्सर शिव थापा (Shiv Thapa) याने पाकिस्तानच्या सुलेमान बलोचला (Suleman Baloch) याला 5-0 च्या फरकाने मात देत 63 किलो वजनी गटात पहिला विजय मिळवला आहे.
आजपासून कॉमनवेल्थ खेळांना सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी भारताचा बॉक्सर शिव थापा याने राऊंड ऑफ 32 चा सामना पाकिस्तानच्या सुलेमान बलोच विरुद्ध खेळला. सुरुवातीपासूनच शिवने सामन्यावर आपली पकड ठेवली होती. त्यामुळे सुलेमानला त्याचा सामना करणं कठीण जात होतं. अखेर सामन्यात सुलेमानला अधिक प्रतिवार न करु देता थेट 5-0 च्या फरकाने सुलेमानला मात देत सामना खिशात घातला.
.@shivathapa advances to R16🥊
— Boxing Federation (@BFI_official) July 29, 2022
Former Asiad gold winner gets off to a strong start to his #CWG2022 campaign with a dominating 5️⃣-0️⃣win against Baloch Suleman of 🇵🇰 .
Kudos on the win! 💪👏😍
#Commonwealthgames
#B2022
#PunchMeinHainDum 2.0 pic.twitter.com/IVyKWqUzz5
पहिल्या दिवशी भारताची चांगली सुरुवात
टेबल टेनिसच्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत मनिका बत्रानं मुशफिकुह कलामचा 11-5 अशा फरकानं पराभव केलाय. या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये मनिका बत्रानं प्रतिस्पर्धी खेळाडू मुशफिकुह कलामवर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही आक्रमक खेळी करत मुशफिकुह कलामला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. ज्यामुळं दुसरा सेटही तिनं एकतर्फी जिंकला. दरम्यान, महिला दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय जोडी रिथ टेनिसन (Reeth Tennison) आणि श्रीजा अकुलानं (Sreeja Akula) दमदार कामगिरी केली. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारतीय जोडीनं दक्षिण आफ्रिकेच्या लैला एडवर्ड्स (Lailaa Edwards) आणि दानिशा पटेलला (Danisha Patel) पराभूत करत कॉमनवेल्थ मोहिमेची सुरुवात केली.
हे देखील वाचा-