(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Commonwealth Games 2022 Day 1 Live Updates: क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिसपासून सर्वकाही; कॉमनवेल्थ स्पर्धेतील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
Commonwealth Games 2022 Live: बर्मिंगहॅम येथे रंगणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे.
LIVE
Background
Commonwealth Games 2022 Live: बर्मिंगहॅम येथे रंगणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा गुरुवारी पार पडला. ज्यात अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. मात्र, आजपासून कॉमनवेल्थ स्पर्धेतील स्पर्धांना सुरुवात होणार आहे. यामध्ये भारताचा पहिला सामना दुपारी एक वाजता सुरु होईल. लॉन बॉलमध्ये तानिया चौधरीचा सामना स्कॉटलंडच्या डी होगनशी होईल. पुरुषांच्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे.
भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार क्रिकेटचा पहिला सामना
यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत महिला क्रिकेटचाही राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश करण्यात आलाय. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. भारताकडून कुशाग्र रावत, साजन प्रकाश आणि श्रीहरी नटराज स्विमिंग स्पर्धेत नशीब आजमावतील. या स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनमधील पहिला सामना पाकिस्तानशी होईल. मिश्र दुहेरी गटातील या सामन्याला संध्याकाळी 6.30 वाजता सुरुवात होईल.
भारतीय खेळाडू दिसणार सायकलिंग ट्रॅकवर
भारतीय खेळाडूही सायकलिंग ट्रॅकवर दिसणार आहेत. पुरुषांच्या स्पर्धेत विश्वजित सिंह, नमन कपिल, वेकाप्पा केंगलागुट्टी, दिनेश कुमार आणि अनाथ नारायण चार हजार मीटरमध्ये नशीब आजमावतील. दुपारी साडेचार वाजता टेबल टेनिस स्पर्धेला सुरूवात होईल. यामध्ये पुरुष संघाचा सामना पहिल्या फेरीत बार्बाडोसशी होणार आहे. यानंतर भारतीय संघ सिंगापूरसोबत खेळणार आहे.
आज भारत आणि घाना यांच्यात हॉकी सामना
पहिल्या दिवशी भारतीय महिला हॉकी संघाचा सामना घानाशी होणार आहे. हा सामना संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. बॉक्सिंगमध्ये संध्याकाळी 5 वाजता शिव थापाची लढत पाकिस्तानच्या सुलेमान बलोचशी होईल. टेबल टेनिसमध्ये महिला संघ पहिल्या फेरीत दुपारी 2 वाजता दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. तर, योगेश्वर सिंह आणि सत्यजित मंडल जिम्नॅस्टिकमध्ये आपली ताकद दाखवतील. सायंकाळी 4.30 वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होईल.
हे देखील वाचा-
- CWG 2022 Opening Ceremony: कॉमनवेल्थ स्पर्धेचा शुभारंभ; पीव्ही सिंधू, मनप्रित सिंहकडं भारतीय चमूचं नेतृत्व
- WI vs IND T20 Series: चहलला विश्रांती, जाडेजाच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह; कोणाला मिळणार संधी?
- Commonwealth Games 2022 : भारतीय महिला कॉमनवेल्थसाठी सज्ज, 'या' 5 महिला क्रिकेटपटू मिळवून देऊ शकतात सुवर्णपदक
Commonwealth Games 2022, India vs Pakistan : भारतीय बॅडमिंटनपटूंची पाकिस्तानवर मात
भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, किंदम्बी श्रीकांत यासाऱ्यांनी मिळून पाकिस्तानच्या खेळाडूंना मात देत 5-0 ने विजय मिळवला आहे.
CWG day 1 : आजच्य़ा दिवसातील उर्वरीत सामने
Coming UP Now for India at @birminghamcg22 #EkIndiaTeamIndia #WeAreTeamIndia pic.twitter.com/2RKJc3xf5H
— Team India (@WeAreTeamIndia) July 29, 2022
Commonwealth Games 2022, India vs Ghana : भारताचा घानावर दमदार विजय, 5-0 ने दिली मात
कॉमनवेल्थ खेळांच्या पहिल्या दिवशी भारताने दमदार खेळ सुरु ठेवला असून महिला हॉकी संघाने पहिल्याच सामन्यात घानावर 5-0 ने विजय मिळवला आहे.
Commonwealth Games 2022, India vs Ghana : भारताचा घानावर दमदार विजय, 5-0 ने दिली मात
कॉमनवेल्थ खेळांच्या पहिल्या दिवशी भारताने दमदार खेळ सुरु ठेवला असून महिला हॉकी संघाने पहिल्याच सामन्यात घानावर 5-0 ने विजय मिळवला आहे.
Commonwealth Games 2022, India vs Ghana : भारताचा पहिला गोल, 1-0 ची आघाडी
भारताच्या गुरजीत कौरने पहिला गोल करत घानाविरुद्धच्या सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली आहे.