एक्स्प्लोर
बीपीएलमध्ये गेलची तुफानी खेळी, 18 षटकारांचा पाऊस
दरम्यान, आजच्या 18 षटकारांसह ट्वेण्टी-20 मध्ये ख्रिस गेलच्या षटकारांच्या संख्या तब्बल 819 वर पोहचली आहे.
ढाका : गोलंदाजांच्या काळजात धडकी भरवणारा फलंदाज आणि षटकारांचा बादशाह ख्रिस गेलने आणखी एक विक्रम केला आहे. ढाक्यातील शेर ए बांग्ला नॅशनल स्टेडियममध्ये सुरु असलेल्या बांगादेश प्रीमियर लीगमधील ट्वेण्टी-20 सामन्यात, गेलने तब्बल 18 षटकारांचा पाऊस पाडला.
सर्वाधिक षटकारांचा विक्रम
रंगपूर रायडर्सकरुन खेळताना गेलने अवघ्या 69 चेंडूत 146 धावांची लयलूट केली. टी-20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार ठोकणारा ख्रिस गेल हा एकमेव फलंदाज आहे. याआधी सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम गेलच्याच नावावर होता. 2013 मध्ये रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरतर्फे पुणे वॉरिअर्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात त्याने 175 धावांची विक्रमी खेळी केली होती. त्यामध्ये 17 षटकारांचा समावेश होता.
दरम्यान, आजच्या 18 षटकारांसह ट्वेण्टी-20 मध्ये ख्रिस गेलच्या षटकारांच्या संख्या तब्बल 819 वर पोहचली आहे.
टी-20 मध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारा एकमेव फलंदाज
याचबरोबर टी-20 सामन्यात 20 शतकं ठोकून आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. ट्वेण्टी-20 फॉरमॅटमध्ये गेल वगळता कोणत्याही फलंदाजाला शतकांचा दुहेरी आकडा गाठता आलेला नाही. मायकल क्लिंगर, ल्यूक राईट आणि ब्रेण्डन मॅक्युलम या तिघांच्या नावावर सात शतकं जमा असून ते संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहेत.
11 हजार धावा करणारा पहिला फलंदाज
11 हजार धावांचा टप्पा गाठणारा ख्रिस गेला हा जगातला पहिला फलंदाज बनला आहे. त्याने 320 व्या सामन्यात हा पल्ला गाठला. गेलपाठोपाठ न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेण्डन मॅकलम असून त्याने 309 सामन्यात 8526 धावा केल्या आहेत.
रंगपूर रायडर्सचा 57 धावांनी विजय
या सामन्यात गेल 22 धावांवर असताना ढाका डायनामाईटच्या शाकिब अल हसनने त्याला जीवदान दिलं होतं. सामन्यात गेलने ब्रेण्डन मॅकलमसोबत 201 धावांची नाबाद भागीदारीही रचली. टी-20 च्या अंतिम सामन्यात रचलेली ही सर्वात मोठी भागीदारी आहे. या भागीदारीच्या जोरावर रंगपूर रायडर्सला एक बाद 206 धावा अशी धावसंख्या करता आली. रंगपूर रायडर्सने अंतिम सामन्यात 57 धावांनी विजय मिळवला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement