एक्स्प्लोर

धोनीची चेन्नईच 'सुपर किंग', तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन

शतकी खेळी करणारा सलामीचा शेन वॉटसन चेन्नईच्या फायनलमधल्या यशाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्याने 57 चेंडूंत आठ षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 117 धावांची नाबाद खेळी केली.

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सने धुव्वा उडवून तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. चेन्नईने याआधी 2010 आणि 2011 साली आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. शतकी खेळी करणारा सलामीचा शेन वॉटसन चेन्नईच्या फायनलमधल्या यशाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्याने 57 चेंडूंत आठ षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 117 धावांची नाबाद खेळी केली. आयपीएलच्या फायनलमध्ये शतक झळकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला. 16 धावा करणाऱ्या अंबाती रायडूने विजयी चौकार ठोकला. चेन्नईने यंदा तिसरं विजेतेपद पटकावून आयपीएलमधलं पुनरागमन मोठ्या रुबाबात साजरं केलं. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नईवर गेली दोन वर्षे बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा महेंद्र सिंह धोनीच्याच नेतृत्त्वात मैदानात उतरत आपणच चॅम्पियन असल्याचं सिद्ध करुन दिलं. वॉटसनने सुरेश रैनाच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या 57 चेंडूंत 117 धावांची भागीदारी उभारली. या भागीदारीने हैदराबादच्या आव्हानातली हवाच काढून घेतली. चेन्नईने नऊ चेंडू राखून हैदराबादचं आव्हान पार केलं. शेन वॉटसनचं यंदाचं दुसरं शतक सलामीवीर फलंदाज शेन वॉटसनने यंदाच्या आयपीएलमधलं दुसरं शतक ठोकलं. यापूर्वीच त्याच्या नावावर एक शकत जमा होतं. फायनल सामन्यात धावसंख्येचा पाठलाग करताना शतक ठोकणारा तो आयपीएल इतिहासातला एकमेव फलंदाज आहे. विशेष म्हणजे शेन वॉटसन खेळायला आला तेव्हा पहिल्या 10 चेंडूमध्ये त्याच्या खात्यात एकही धाव नव्हती. मात्र पुढच्या 41 चेंडूमध्ये त्याने 100 धावा पूर्ण केल्या. चेन्नई तिसऱ्यांदा चॅम्पियन या विजयासोबतच चेन्नईने तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे. यापूर्वी 2010 साली मुंबई इंडियन्सविरुद्ध अंतिम सामना 22 धावांनी जिंकला होता, तर 2011 साली फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 58 धावांनी पराभव केला होता. विशेष म्हणजे तीनही वेळा धोनीच्याच नेतृत्त्वात चेन्नईने आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2024 Hardik Pandya: सर्वाधिक धावा केल्या, शेवटपर्यंत लढला; पण शेवटी त्यालाच जबाबदार धरला, हार्दिक काय म्हणाला?
सर्वाधिक धावा केल्या, शेवटपर्यंत लढला; पण पराभवासाठी त्यालाच जबाबदार धरला, हार्दिक काय म्हणाला?
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या पोस्टरवर झळकले गोपीनाथ मुंडे, राजू राजळेंचे फोटो, भाजपनं उचललं मोठं पाऊल
निलेश लंकेंच्या पोस्टरवर झळकले गोपीनाथ मुंडे, राजू राजळेंचे फोटो, भाजपनं उचललं मोठं पाऊल
Kolhapur News : महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
'मविआ'ची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
Amol Kolhe Vs Adhalrao Patil : प्रचारावेळी अमोल कोल्हेंची पंचायत कोण करतंय? कोल्हेचा हल्ला; नाटकं करण्यात कोल्हे पटाईट, आढळरावांचा प्रतिहल्ला
Amol Kolhe Vs Adhalrao Patil : प्रचारावेळी अमोल कोल्हेंची पंचायत कोण करतंय? कोल्हेचा हल्ला; नाटकं करण्यात कोल्हे पटाईट, आढळरावांचा प्रतिहल्ला
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Abhijeet Patil Madha Lok Sabha : शरद पवारांचे निकटवर्तीय अभिजीत पाटील भाजपच्या वाटेवर? ..Thane Loksabha : ठाण्यातून मीनाक्षी शिंदे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता : ABP MajhaABP Majha Headlines : 11 AM  : 28 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray Sabha : उद्धव ठाकरेंची आज रत्नागिरीत सभा, रश्मी ठाकरे उपस्थित राहणार : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2024 Hardik Pandya: सर्वाधिक धावा केल्या, शेवटपर्यंत लढला; पण शेवटी त्यालाच जबाबदार धरला, हार्दिक काय म्हणाला?
सर्वाधिक धावा केल्या, शेवटपर्यंत लढला; पण पराभवासाठी त्यालाच जबाबदार धरला, हार्दिक काय म्हणाला?
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या पोस्टरवर झळकले गोपीनाथ मुंडे, राजू राजळेंचे फोटो, भाजपनं उचललं मोठं पाऊल
निलेश लंकेंच्या पोस्टरवर झळकले गोपीनाथ मुंडे, राजू राजळेंचे फोटो, भाजपनं उचललं मोठं पाऊल
Kolhapur News : महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
'मविआ'ची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
Amol Kolhe Vs Adhalrao Patil : प्रचारावेळी अमोल कोल्हेंची पंचायत कोण करतंय? कोल्हेचा हल्ला; नाटकं करण्यात कोल्हे पटाईट, आढळरावांचा प्रतिहल्ला
Amol Kolhe Vs Adhalrao Patil : प्रचारावेळी अमोल कोल्हेंची पंचायत कोण करतंय? कोल्हेचा हल्ला; नाटकं करण्यात कोल्हे पटाईट, आढळरावांचा प्रतिहल्ला
T20 World Cup 2024: हार्दिक पांड्याची निवड झाल्यास....; अजित आगरकर अन् रोहित शर्माची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
हार्दिकची निवड झाल्यास....;आगरकर अन् रोहितची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
Manoj Jarange : मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय; मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला डिवचलं
मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय; मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला डिवचलं
Narayan Rane : नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपकडून मोठी रणनिती; सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती
Narayan Rane : नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपकडून मोठी रणनिती; सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती
Abhijeet Patil: माढ्यातील मोदींच्या सभेपूर्वी फडणवीसांचा डबल धमाका, शरद पवारांच्या मर्जीतील नेत्याला गळाला लावलं
माढ्यातील मोदींच्या सभेपूर्वी फडणवीसांचा डबल धमाका, शरद पवारांच्या मर्जीतील नेत्याला गळाला लावलं
Embed widget