एक्स्प्लोर
champions trophy 2017 : आता बॅटमध्ये मायक्रो चिप, ICC चा निर्णय
लंडन: क्रिकेटमध्ये सातत्याने नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर होत असताना, आता आणखी एक नवं तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.
आता थेट खेळाडूंच्या बॅटमध्ये मायक्रो चिप बसवण्यात येणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपासून मायक्रो चिप बसवण्यात येईल.
यामुळे फलंदाजाने एखाद्या बाऊन्सरवर किती क्षणात फटका खेळला किंवा एखादा फलंदाजाने फटका खेळल्यानंतर, चौकार जाण्यासाठी किती सेकंद लागले, याबाबतची सर्व उत्तरं मिळणार आहेत.
आयसीसीने याबाबत निर्णय घेतला असून, प्रत्येक संघातील 3 खेळाडूंच्या बॅटमध्ये ही मायक्रो चिप बसवण्यात येईल. हे तीन खेळाडू कोण असतील आणि त्यांची निवड कशी होईल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र यामध्ये आघाडीचे तीन फलंदाज असू शकतात.
जर तसं झालं तर भारतीय संघातील रोहित शर्मा, शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांच्या बॅटमध्ये ही मायक्रो चिप बसवली जाऊ शकतो.
यापूर्वी 2016 मध्ये अमेरिकेतील रग्बी लीगमध्ये रग्बी बॉलमध्ये अशाप्रकारची चिप बसवण्यात आली होती.
याशिवाय आयपीएलमध्ये आपण स्टम्प, बेल्समध्ये लाईटही पाहिली आहे. तसंच वेगवेगळे अॅक्शन टाईम टिपणारे कॅमेरे, स्पायडर कॅम वगैरेसारख्या तंत्रज्ञानामुळे क्रिकेटमध्ये पारदर्शकता आली आहे.
आता त्याच्या पुढे जाऊन आयसीसीने थेट खेळाडूंच्या बॅटमध्येच चिप बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement