एक्स्प्लोर
Advertisement
champions trophy : भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय
लंडन: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात टीम इंडियानं बांगलादेशला 50 षटकांत सात बाद 264 धावांत रोखलं आहे. त्यामुळं हा सामना जिंकून फायनलचं तिकीट मिळवायचं, तर विराट कोहलीच्या भारतीय संघासमोर 265 धावांचं आव्हान आहे.
LIVE: भारताचा बांगलादेशवर 9 विकेट राखून दणदणीत विजय, टीम इंडियाची फायनलमध्ये धडक
LIVE : रोहित शर्माचं शानदार शतक, 111 चेंडूत 102 धावा, रोहितचं वनडेतील अकरावं शतक, टीम इंडिया विजयाच्या समीप
LIVE: विराटचं खणखणीत अर्धशतक, भारत मजबूत स्थितीत
LIVE: रोहित शर्माचं शानदार अर्धशतक, 57 चेंडूत 50 धावा
LIVE: भारताला पहिला धक्का, शिखर धवन 46 धावांवर बाद
या सामन्यात भारताच्या भुवनेश्वर कुमारची तोफ सलामीलाच धडाडली. त्यानं सौम्य सरकार आणि शब्बीर रहमान स्वस्तात माघारी धाडलं होतं. पण त्यानंतर तमिम इक्बाल आणि मुशफिकुर रहिम यांनी तिसऱ्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी रचून बांगलादेशच्या डावाला आकार दिला.
तमिम आणि मुशफिकुर रहिम यांनी भारतीय आक्रमणावर चढवलेला हल्लाबोल पाहता बांगलादेश भारताला विजयासाठी मोठं लक्ष्य देणार असं वाटत होतं. पण केदार जाधवच्या फिरकीनं सामन्याला पुन्हा गिरकी दिली. त्यानं तमिम आणि मुशफिकुर यांच्या दोन बहुमोल विकेट्स काढून सामना पुन्हा भारताच्या बाजूनं झुकवला.
LIVE : बांगलादेशचं भारतासमोर 265 धावांचं आव्हान
LIVE : बांगलादेशला सहावा धक्का, बुमराचा भेदक मारा
LIVE : बांगलादेशला पाचवा धक्का, केदार जाधवनं घेतले दोन बळी
LIVE : बांगलादेशचा चौथा गडी बाद, शकीब अल हसन बाद
LIVE: बांगलादेशला तिसरा धक्का, तमिम इक्बाल 70 धावांवर बाद
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकली असून, त्यानं या सामन्यात पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळं बांगलादेशला या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करावी लागणार आहे.
भारत आणि बांगलादेश संघांमधला हा सामना बर्मिंगहॅमच्या एजबस्टनवर खेळवण्यात येत आहे. भारतानं बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातलाच संघ कायम ठेवला आहे.
LIVE UPDATE -
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणांगणात भारताच्या भुवनेश्वर कुमारची तोफ सुरुवातीपासूनच धडाडली. त्यानं सलामीचा सौम्य सरकार आणि शब्बीर रहमानला माघारी धाडून बांगलादेशला बॅकफूटवर धाडलं आहे. त्यामुळं उपांत्य फेरीच्या या सामन्यात बांगलादेशवर दोन बाद 31 अशी कठीण वेळ ओढवली होती. पण मुशफिकुर रहिमनं भारतीय आक्रमणावर प्रतिहल्ला चढवून बांगलादेशच्या डावाला आकार दिला.
- भुवनेश्वरचा दणका, सौम्या सरकारची दांडी गुल, बांगलादेश 1/1 (0.5) #IndvsBan
- भुवनेश्वरचा दुसरा दणका, सब्बीर रहमान (19) बाद, बांगलादेश 31/2 (6.5)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भविष्य
मुंबई
भारत
Advertisement