एक्स्प्लोर
Advertisement
विराटची दुखापत गंभीर नाही, रांची कसोटीत कोहली खेळणार!
रांची: रांची कसोटीत पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीचा खांदा दुखावला. मात्र, विराटची दुखापत गंभीर नसल्याचं स्कॅन चाचणीत आढळून आल्याची माहिती बीसीसीआयनं दिली आहे. त्यामुळं दुखापतग्रस्त खांद्यावर उपचार सुरू असतानाच तो रांची कसोटीत खेळू शकेल असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.
पीटर हॅण्ड्सकोम्बच्या फटक्यावर सीमापार जाणारा चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात विराटचा उजवा खांदा दुखावला होता. त्यामुळं तो अर्ध्या दिवसाहून अधिक काळ क्षेत्ररक्षण करू शकला नाही. विराटला दुखापत झाली त्या वेळी, टीम इंडियाचे फिजियो पॅट्रिक फरहार्ट लगेचच मैदानात धावले. त्यांनी भारतीय कर्णधाराची तपासणी केली. त्यानंतर विराटला उपचारांसाठी मैदानाबाहेर जावं लागलं.
पण तो ड्रेसिंगरूममध्ये फटक्यांची शॅडो प्रॅक्टिस करताना दिसला. दरम्यान, विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेनं टीम इंडियाच्या नेतृत्त्वाची धुरा सांभाळली. संबंधित बातम्या: डाईव्ह मारताना कोहलीला दुखापत, मैदानातून बाहेरNEWS ALERT - Captain Virat Kohli recuperating from shoulder strain. Relevant investigations have revealed that there are no serious concerns pic.twitter.com/v5tgdZlKHx
— BCCI (@BCCI) March 16, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement