एक्स्प्लोर

रोहित पवारांना पक्षाचा ताबा हवाय; राष्ट्रवादीच्या आमदाराचा गंभीर आरोप, सुनिल शेळकेंचाही पलटवार

रोहित पवार यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, रोहित पवार काही एजन्सी नाहीत, त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी तपास यंत्रणांकडे द्यावेत, असे आमदार अनिल पाटील यांनी म्हटले.

मुंबई: दिवंगत नेते अजित पवार (Ajit pawar) यांच्या अपघाती निधनावर शंका उपस्थित करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी बड्या नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन चौकशीची मागणी केली. त्यातच, काल त्यांनी बारामती पोलीस स्टेशनमध्ये व्हीएसआर कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या केला होता. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने त्यांनी आज मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. रोहित पवार पत्रकार परिषदेतून सातत्याने अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यावर, आता राष्ट्रवादीच्या आमदारांनी पलटवार केला आहे. आमदार अनिल पाटील आणि सुनिल शेळके यांनी रोहित पवारांवर (Rohit Pawar) हल्लाबोल केला. हे नाटक करायची गरज नाही, असे आमदार शेळकेंनी म्हटलं. तर, रोहित पवारांना पक्षाचा कब्जा हवा आहे, त्यासाठीच ते आमच्या नेत्यांवर खापर फोडत आहेत, असा पलटवार अनिल पाटील (Anil Patil) यांनी केला आहे. 

अजित दादांवर जर तुमचं खरं प्रेम असेल तर नाटक करायची काही गरज नाही. रोहित पवार यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, रोहित पवार काही एजन्सी नाहीत, त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी तपास यंत्रणांकडे द्यावेत, असे आमदार अनिल पाटील यांनी म्हटले. जर त्यांना सुनेत्रा पवार यांच्याबद्दल एवढंच वाटत आहे तर जेव्हा त्या राष्ट्रीय अध्यक्ष होत आहेत, तेव्हा त्यांना सोडून जायला नको होतं. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार पत्रकारांना थोड्या दिवसात बोलतील. अमोल मिटकरी असेल किंवा आम्ही सगळे आमदार असू, आमचं एकच म्हणणं आहे की सगळ्या घटनेचा तपास झाला पाहिजे, सत्य बाहेर आलं पाहिजे आणि यंत्रणा ते काम करतील, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

रोहित पवारांना पक्षाचा कब्जा हवाय 

रोहित पवारांना कब्जा पक्षाचा हवा आहे, त्यासाठी ते आमच्या नेत्यांवर खापर फोडत आहेत, असा गंभीर आरोपही अनिल पाटील यांनी रोहित पवारांवर केला आहे. राज ठाकरे असतील किंवा रोहित पवार असतील ते काहीही बोलू द्यात, यंत्रणा योग्य तो तपास करतील, असेही पाटील यांनी म्हटले. 

रोहित पवारांनी आपल्या पक्षात पाहावं

रोहित पवार हे दररोज नव नवीन पुरावे समोर आणत आहेत, मग ते वरिष्ठ नेते पवारसाहेब, सुनेत्राताई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बसून त्यांच्यासमोर का मांडत नाही आहेत. दादांच्या बाबतीत कुणीही राजकारण करत नाही. मुळात आमच्या पक्षात काय चाललयं याकडे पाहण्यापेक्षा आपल्या पक्षात काय चाललयं हे पहावं. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी सुनेत्राताईंची निवड करून योग्य तो मानसन्मान आम्ही ठेवलेला आहे. झिरवळांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिले आहे रोहित पवार जे आरोप करत आहेत त्यात तथ्य नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काॅग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांनी दिली त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी

हेही वाचा

शरद पवार मोठे नेते पण आम्ही राज्यसभेची जागा सोडणार नाही; ठाकरेंच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget