न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत टीम इंडियाने न्यूझीलंडवर 321 धावांनी विजय मिळवत न्यूझीलंडला क्लीन स्वीप दिला. या क्लीन स्वीपमुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा यशस्वी कर्णधारांच्या यादीत समावेश झाला आहे.
2/6
आजच्या सामन्यानंतर कोहलीने आपल्या 17 व्या कसोटीतील 10 व्या विजयाने टीम इंडियाच्या माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि मन्सूर अली खान पटौदी यांनाही पिछाडीवर टाकले. यापूर्वी सुनील गावस्कर आणि मन्सूल अली खान पटौदी यांच्या नावावर 9 विजयांचा विक्रम होता.
3/6
आता याच यादीत कर्णधार विराट कोहलीचाही समावेश झाला आहे.
4/6
अझहरनंतर तब्बल 10 वर्षांनी टीम इंडियाने प्रतिस्पर्धी संघाला तिसऱ्यांदा क्लीन स्वीप दिला. 2012-13 मध्ये महेंद्र सिंह धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला 4-0ने क्लीन स्वीप दिला.
5/6
यानंतर 1993-94 मधील श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेतही अझहरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला.
6/6
यापूर्वीच्या दोन कर्णधारांनी तीन किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप दिला होता. या आधी टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने पहिल्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप दिला. अझहरने 1992-93मध्ये इंग्लड विरुद्धच्या मालिकेत इंग्लंडवर विजय मिळवला होता.