एक्स्प्लोर
बलात्कारप्रकरणी ब्राझीलच्या फुटबॉलपटूला 9 वर्षांची शिक्षा
ब्राझीलचा फुटबॉलपटू रोबिंहोला बलात्कारप्रकरणी तब्बल 9 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मिलान (इटली) : ब्राझीलचा फुटबॉलपटू रोबिंहोला बलात्कारप्रकरणी तब्बल 9 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2013 मिलानमध्ये एका महिलेसोबत बलात्कार केल्याचा आरोप रोबिंहोवर होता. रोबिंहोसह इतर पाच खेळाडूंनी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
न्यूज एजन्सी सिन्हुआच्या वृत्तानुसार, इटलीच्या कोर्टानं रोबिंहो आणि इतर पाच खेळाडूंना सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं. पण इतर खेळांडूची सुनावणी सध्या स्थगित करण्यात आली आहे. याप्रकरणी 71,000 हजार डॉलर पीडित महिलेला देण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.
दरम्यान, या खटल्यातील एकाही सुनावणीला रोबिंहो हजर नव्हता. मात्र, आजच्या निकालानंतर त्यानं आपल्या इंस्टाग्रामवर याबाबत आपलं म्हणणं मांडलं. 'मी आधीच स्पष्ट केलं होतं की, त्या घटनेत मी सहभागी नव्हतो.'
मात्र, अपील करण्याची प्रकिया पूर्ण होईपर्यंत रोंबिहोला शिक्षा लागू होणार नसल्याचं समजतं आहे. रोबिंहो हा इटलीच्या एसी मिलान क्लबकडून 2010 ते 2015 पर्यंत खेळत होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement