एक्स्प्लोर
गंभीरला भारताच्या कसोटी संघातून डच्चू, भुवीचा समावेश

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी भारताच्या सोळा सदस्यीय संघातून सलामीवीर गौतम गंभीरला डच्चू देण्यात आला आहे. त्याच्याऐवजी संघात वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या इंदूर आणि इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटी सामन्यांमध्ये फारशी चमक दाखवू न शकलेल्या गौतम गंभीरला सोळा सदस्यीय संघातूनही वगळण्यात आलं आहे.
Team : Virat (Capt), Rahane, Rahul, Vijay, Pujara, K Nair, Saha (WK), Ashwin, Jadeja, Jayant, Mishra, Shami, Umesh, Ishant, Bhuvi, Hardik — BCCI (@BCCI) November 22, 2016गौतम गंभीरऐवजी भुवनेश्वर कुमार हा भारताच्या कसोटी संघात करण्यात आलेला एकमेव बदल आहे. न्यूझीलंडविरुद्ध कोलकाता कसोटीत पाच विकेट घेणारा भुवनेश्वर पाठीच्या दुखापतीमुळे सहा आठवड्याहून अधिक क्रिकेटपासून दूर होता. भुवनेश्वर संघात आल्यानं आता कर्णधार विराट कोहलीला वेगवान गोलंदाजीसाठी चार पर्याय उपलब्ध आहेत.
आणखी वाचा























