एक्स्प्लोर
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला अटक!
अटक करण्यात आल्यामुळे बेन स्टोक्स वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या न डेत खेळू शकणार नाही.
लंडन : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला सोमवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. एका व्यक्तीला मारहाण केल्यामुळे त्याला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वन डेत बेन स्टोक्स खेळू शकणार नाही.
स्टोक्सचा सहकारी अॅलेक्स हेल्सही चौथ्या वन डेला मुकणार आहे. घटना घडली त्यावेळी हेल्स सोबत होता. त्यामुळे पोलिसांना चौकशीत सहकार्य करण्यासाठी हेल्सलाही हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ब्रिस्टल पोलिसांनी बेन स्टोक्सला अटक केली.
बेन स्टोक्सला एका प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली. चौकशीनंतर कोणताही गुन्हा न दाखल करता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र चौथ्या वन डेत तो खेळू शकणार नाही, अशी माहितीही बोर्डाने दिली.
ब्रिस्टलमध्ये रविवारी खेळवण्यात आलेल्या वन डेत बेन स्टोक्सने 63 चेंडूंमध्ये 73 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. ज्यो रुटसोबत त्याने 132 धावांची भागीदारी केली. हा सामना जिंकून इंग्लंडने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement