एक्स्प्लोर
महिला संघातील प्रत्येक खेळाडूला BCCI कडून 50 लाखांचं बक्षिस
आयसीसी महिला विश्वचषकात मिताली राजची ब्रिगेड चमकदार कामगिरी बजावत आहे. त्यामुळेच बीसीसीआयने महिला संघातील प्रत्येक खेळाडूला 50 लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : आयसीसी महिला विश्वचषकात मिताली राजची ब्रिगेड चमकदार कामगिरी बजावत आहे. त्यामुळेच बीसीसीआयने महिला संघातील प्रत्येक खेळाडूला 50 लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. सहा वेळा विजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघावर 36 धावांनी मात करत भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वात रविवारी टीम इंडिया इंग्लंडचा सामना करणार आहे. बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सीके खन्ना यांनी महिला संघाचा यथोचित गौरव करणार असल्याचं शुक्रवारी जाहीर केलं होतं. आपला शब्द पाळत त्यांनी महिला संघातील प्रत्येक खेळाडूला 50 लाख रुपयांचं रोख पारितोषिक घोषित केलं आहे. सर्पोटिंग स्टाफमधील प्रत्येकाला 25 लाख रुपये इनाम मिळणार आहे.
महिला विश्वचषकाच्या फायनलसाठी ऐतिहासिक तिकिट विक्री
'प्रत्येक सामन्यागणिक महिला संघाची कामगिरी उत्तमोत्तम होत चालली आहे. आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. विशेषतः हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियन संघाची उडवलेली दाणादाण.' असं सीके खन्ना म्हणाले.12 वर्षांनी भारतीय महिला संघ विश्वचषकाच्या फायनलमध्ये
आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने दुसऱ्यांदाच प्रवेश केला आहे. 2005 मध्ये अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मिताली राज आणि झुलन गोस्वामी त्यावेळीही टीम इंडियात होत्या....म्हणून वडिलांनी मिताली राजच्या हाती बॅट सोपावली!
रविवारी टीम इंडियाचा सामना यजमान इंग्लंडशी होणार आहे. भारताने साखळी फेरीतच इंग्लंडला गारद केलं होतं, मात्र तरीही 'साहेबीणीं'ना कमी लेखण्याची चूक मिताली राजची महिला ब्रिगेड करणार नाही, हे निश्चित.संबंधित बातम्या :
हरमनप्रीतने पुरुषांच्या क्रिकेटमधील विक्रमही मोडला
'हरमनप्रीत तू रॉक स्टार आहेस', देशभरातून कौतुकाचा वर्षाव
...म्हणून हरमनप्रीत कौर वीरेंद्र सेहवागला आदर्श मानते!
महिला विश्वचषकात भारताचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी
मिताली राज महिला वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज
मिताली राजने अर्धशतकांच्या बाबतीत विराटलाही मागे टाकलं!
बॅटिंगआधी पुस्तक का वाचत होते, मिताली म्हणते…!
आणखी वाचा























