एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'पद्मभूषण'साठी महेंद्र सिंह धोनीच्या नावाची शिफारस
धोनीला आतापर्यंत अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं आहे.
मुंबई : 'पद्मभूषण' सन्मानासाठी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. पद्म पुरस्कारांसाठी धोनीचं नाव सुचवल्याच्या वृत्तावर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. 'पद्मभूषण' हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या माहीची एकमताने निवड झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे धोनीशिवाय इतर कुठल्याही क्रिकेटपटूच्या नावाची शिफारस पद्म पुरस्कारांसाठी बीसीसीआयने केलेली नाही.
2007 मधील टी20 विश्वचषक आणि 2011 मधील विश्वचषक जिंकण्याचा मान धोनीला मिळाला आहे. धोनी आतापर्यंत 90 कसोटी सामने खेळला असून त्यामध्ये 4 हजार 800 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर 300 हून जास्त एक दिवसीय सामने खेळणाऱ्या धोनीने वनडेमध्ये 9 हजार 816 धावा ठोकल्या आहेत.
धोनीने 78 टी20 सामने खेळले असून 1 हजार 212 धावा केल्या आहेत. धोनीच्या नावावर 100 आंतरराष्ट्रीय
अर्धशतकांसह 16 आंतरराष्ट्रीय शतकं ( 6 कसोटी, तर 10 वनडे) जमा आहेत. विकेटकीपर म्हणून धोनीने 584 झेल घेतले आहेत (कसोटीमध्ये 256, वनडेमध्ये 285 आणि टी20 मध्ये 43)
धोनीला आतापर्यंत अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं आहे. पद्मभूषणने गौरवण्यात आलास तो हा सन्मान पटकवणारा 11 वा भारतीय क्रिकेटपटू ठरेल. आतापर्यंत सचिन तेंडुलकर, कपिल देव, सुनिल गावस्कर, राहुल द्रविड, चंदू बोर्डे, प्रा. डीबी देवधर, कर्नल सीके नायडू, लाला अमरनाथ यांना पद्मभूषण मिळालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
Advertisement