एक्स्प्लोर

पुण्यातील आयपीएल प्लेऑफ सामने लखनौला हलवणार?

महेंद्रसिंह धोनीचा संघ खेळणार पुण्यात खेळणार असल्यामुळे चाहते खुश होते, मात्र या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. पुण्यात होणारे आयपीएल प्लेऑफचे सामने लखनौच्या मैदानावर हलवण्याची शक्यता आहे.

मुंबई : चेन्नईत कावेरी पाणीवाटपाच्या मुद्द्यावरुन होत असलेल्या विरोधामुळे, चेन्नई सुपरकिंग्जला पुण्याचं गहुंजे स्टेडिअम होम ग्राऊंड म्हणून देण्यात आलं. महेंद्रसिंह धोनीचा संघ खेळणार पुण्यात खेळणार असल्यामुळे चाहते खुश होते, मात्र या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. पुण्यात होणारे आयपीएल प्लेऑफचे सामने लखनौच्या मैदानावर हलवण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपरकिंग्जचे सामने सध्या पुण्यात होणार आहेत. मात्र 23 आणि 25 मे रोजी होणारे प्लेऑफ सामने इतर ठिकाणी हालवण्याच्या ठिकाणी सुरु आहेत. ''पुण्याच्या मैदानापेक्षा लखनौच्या मैदानाची प्रेक्षकसंख्या जास्त आहे. अंदाजे 50 हजार प्रेक्षक लखनौच्या मैदानात सामना पाहू शकतात. मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मैदानाची चाचपणी करुन अंतिम निर्णय घेतला जाईल,'' असं बीसीसीआयमधील सूत्रांनी म्हटलं आहे. लखनौसोबत राजकोट आणि कोलकाता या दोन ठिकाणीही प्लेऑफचे सामने हलवले जाऊ शकतात. मात्र बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शाह प्लेऑफचे सामने राजकोटच्या मैदानावर खेळवण्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. त्यातच चेन्नई सुपर किंग्ज आपले घरचे सामने पुण्याच्या मैदानावर खेळणार असल्यामुळे बीसीसीआय प्लेऑफचे सामने अन्यत्र हलवण्याच्या मनस्थितीत आहे. दरम्यान, पुण्यात नुकत्याच खेळवण्यात आलेल्या चेन्नई विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याची तिकिटं अनेक प्रेक्षकांना मिळाली नव्हती. तिकिटं लवकर बूक झाल्यामुळे चाहत्यांच्या हाती निराशा लागली. धोनीचा संघ पुण्यात खेळणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. पुण्याच्या मैदानात पुढचा सामना 28 एप्रिल रोजी होणार आहे. मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपरकिंग्जसोबत होणार आहे. यापूर्वी आयपीएलच्या सलामीला झालेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईला घरच्या मैदानावर म्हणजे वानखेडेवर मात दिली होती. आता मुंबई चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर मात देऊन बदला घेणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. संबंधित बातम्या :

शेन वॉटसनचं आयपीएलमधलं तिसरं शतक, राजस्थानवर दणदणीत विजय

आयपीएलसाठी चेन्नईच्या चाहत्यांनी संपूर्ण रेल्वेच बुक केली!

चेन्नई सुपरकिंग्जच्या पुण्यातील सामन्यांचं वेळापत्रक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Embed widget