एक्स्प्लोर
सचिन तेंडुलकरची 10 नंबरची जर्सीही निवृत्त!
दरम्यान, सचिन 10 नंबरशिवाय 33 आणि 99 नंबरची जर्सी घालूनही मैदानात उतरला आहे.
मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यात विक्रमांची शिखरं पादाक्रांत केली आहेत. या सगळ्या विक्रमांची साक्षीदार त्याची 10 नंबरची जर्सी आहे. दोन दशकांपेक्षा जास्त वर्षांच्या कारकिर्दीत सचिनने 10 नंबरची जर्सी घालून भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेऊन पोहोचवलं.
परंतु आता बीसीसीआयने अनौपचारिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून 10 नंबरची जर्सी निवृत्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने याबाबत टीम इंडियाच्या सीनियर खेळाडूंशी बातचीत केली आणि त्यावर एकमत झालं. या निर्णयानंतर आता संघाच्या दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला 10 नंबरची जर्सी घालता येणार नाही किंवा जर्सी दिली जाणार नाही.
10 नंबरच्या जर्सीवरुन शार्दुलवर टीका
2012 मध्ये सचिनने वन डे क्रिकेटला अलविदा केल्यानंतर त्याची जर्सीही मैदानातून गायब झाली होती. पंरतु या वर्षी ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबोमधील एकदिवसीय सामन्यात जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरने 10 नंबरची जर्सी घालून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. परंतु सोशल मीडियावर शार्दुल ठाकूरवर जोरदार टीका झाली होती.
हा वाद टाळण्यासाठी बीसीसीआयने 10 नंबरची जर्सी रिटायर करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र खेळाडू 'भारत अ' किंवा सराव सामन्यात 10 नंबरची जर्सी घालू शकतात, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांमधून आता ही जर्सी निवृत्त झाली आहे, असंही बोर्डाने स्पष्ट केलं.
क्रिकेटमध्ये नंबर असलेल्या जर्सीची सुरुवात कधी?
क्रिकेटमध्ये नंबर असलेली जर्सी घालून खेळण्याची सुरुवात 1999 मध्ये इंग्लंडमध्ये आयोजित आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपनंतर झाली. यानंतर खेळाडूंना नंबरची जर्सी घालणं अनिवार्य करण्यात आलं.
सचिनने 2013 मध्ये 10 नंबरची जर्सी शेवटची घातली!
2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या सचिन तेंडुलकरने, 10 नंबरची जर्सी ही मार्च 2012 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शेवटची घातली होती.
दरम्यान, सचिन 10 नंबरशिवाय 33 आणि 99 नंबरची जर्सी घालूनही मैदानात उतरला आहे.
मुंबई इंडियन्सकडून 10 नंबरची जर्सी निवृत्त
तर दुसरीकडे सचिन तेंडुलकर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला आहे. यावेळीही तो 10 नंबरची जर्सी घालून मैदानात उतरत असे. पण 2013 मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर, मुंबई इंडियन्सने ही जर्सी अधिकृतरित्या निवृत्त केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement