एक्स्प्लोर
'बजरंगा'ची कमाल, एशियाडमध्ये भारताला पहिलं सुवर्ण
65 किलो फ्रीस्टाईल प्रकारात बजरंगने सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने अंतिम लढतीत जपानच्या ताकातानी दाईचीचं कडवं आव्हान 10-8 असं मोडीत काढलं.
जकार्ता : पैलवान बजरंग पुनियाने जकार्ता एशियाडमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. 65 किलो फ्रीस्टाईल प्रकारात बजरंगने सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने अंतिम लढतीत जपानच्या ताकातानी दाईचीचं कडवं आव्हान 10-8 असं मोडीत काढलं.
पुनियाला याआधी 2014 च्या इन्चिऑन एशियाडमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं. यावेळी मात्र बजरंगने ती कसर भरुन काढली. याआधी ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही बजरंगने सुवर्णपदक पटकावलं होतं.
सुशील कुमारचं आव्हान संपुष्टात
दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशीलकुमारचं जकार्ता एशियाडमधलं आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आलं. पुरुषांच्या 74 किलो वजनी गटातल्या पात्रता फेरीच्या पहिल्याच लढतीत बहारिनच्या अॅडन बेतिरोव्हने सुशील कुमारला पराभवाचा धक्का दिला.
सुशीलला या लढतीत बेतिरोव्हने 5-3 अशी मात दिली. सुरुवातीला 2-0 अशी आघाडी घेऊनही बेहरिनच्या पैलवानासमोर सुशीलचा निभाव लागला नाही. त्यामुळे एशियाडमध्ये सुवर्णपदक पटकावण्याचं सुशील कुमारचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. 2006 च्या दोहा एशियाडमध्ये सुशीलने कांस्यपदकाची कमाई केली होती.
एशियाडमध्ये पहिल्या दिवशी भारताची कामगिरी
भारताचे नेमबाज अपूर्वी चंडेला आणि रवी कुमारने 18 व्या एशियाडमध्ये भारताला पहिल्या पदकाची कमाई करुन दिली. या जोडीने 10 मीटर एअर रायफल मिश्र दुहेरी प्रकारात कांस्यपदक पटकावलं.
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय नेमबाजांनी पहिलं पदक भारताच्या झोळीत टाकलं. अपूर्वी आणि रवी कुमार या जोडीने 429.9 गुणांची नोंद करत कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. चायनीज तैपेईच्या लीन यींगशीन आणि लू शाओचुआन जोडीने सुवर्ण तर चीनच्या झाओ आणि यांगने रौप्यपदक पटकावलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement