(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Wrestling Championship: बजरंग पुनियानं कांस्यपदक जिंकलं; नावावर नोंदवला खास विक्रम!
World Wrestling Championships 2022: भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियानं (Bajrang Punia) रविवारी सर्बियातील बेलग्रेड येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास रचलाय.
World Wrestling Championships 2022: भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियानं (Bajrang Punia) रविवारी सर्बियातील बेलग्रेड येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास रचलाय. या स्पर्धेतील 65 किलो वजनी गटात पुनियानं पुर्तो रिकोच्या सेबस्टियन रिवेराचा 11-9 असा पराभव केलाय. या विजयासह त्यानं एक मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय. कुस्तीपटू बजरंग पुनियान जागतिक कुस्ती स्पर्धेत आतापर्यंत 4 पदकं जिंकली आहेत. बजरंग पुनिया हा जागतिक कुस्ती स्पर्धेत 4 पदकं जिंकणारा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरलाय. तसेच या स्पर्धेतील भारताचं दुसरं पदक आहे.
भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियानं जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकलंय. या स्पर्धेत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनियानं भारताला दुसरं पदक मिळवून दिलं. याआधी भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटनंही भारतासाठी कांस्यपदक जिंकलंय. बजरंग पुनियानं बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत 65 किलोग्राम वजनी गटात कांस्यपदक जिंकला होतं. या स्पर्धेतील पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये बजरंग पुनियाला जॉन दियाकोमिहालिसकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर रेपचेझमध्ये कांस्यपदक जिंकलंय. जागतिक कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनियानं आतापर्यंत एकूण चार पदकं जिंकली आहेत.
ट्वीट-
4️⃣th Worlds medal for @BajrangPunia 🤼♂️
— SAI Media (@Media_SAI) September 18, 2022
Our Tokyo Olympics BRONZE medalist has bagged a BRONZE🥉 again. This time at the Wrestling World Championships (FS 65kg) in Belgrade🤩
His World Championships CV now:
SILVER - 2018
BRONZE - 2013, 2019, 2022#WrestleBelgrade pic.twitter.com/vF1kOEEflL
भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियानं याआधी जागतिक कुस्ती स्पर्धेत 2013, 2018, आणि 2019 मध्ये पदक जिंकलंय. त्यानं तिसऱ्यांदा कांस्यपदक जिंकलंय. तर, एकदा रौप्यपदकावर कब्जा केलाय. 2018 च्या जागतिक कुस्ती स्पर्धेत त्यानं रौप्यपदक जिंकलं होतं. सर्बियाच्या बेलग्रेड येथे सुरु असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतानं 30 सदस्यांची टीम मैदानात उतरवली होती. परंतु, त्यापैकी फक्त दोन कुस्तीपटूंना पदक जिंकता आलंय.
हे देखील वाचा-