Anushka Sharma: अनुष्का शर्माला येतेय विराट कोहलीची आठवण, सोशल मीडियावर लिहिली खास पोस्ट
Anushka Sharma: अनुष्का शर्मा तिच्या आगामी 'चकदा एक्सप्रेस' चित्रपटाच्या शूटिंगसाठी सध्या लंडनमध्ये आहे. तर, विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतात आहे.
![Anushka Sharma: अनुष्का शर्माला येतेय विराट कोहलीची आठवण, सोशल मीडियावर लिहिली खास पोस्ट Anushka Sharma Misses Husband Virat Kohli](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/19/78bc5dfdafd0cdb1bef459e6974729f51663561645022266_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Anushka Sharma: बॉलिवूडची स्टार अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) तिचा आगामी चित्रपट चकदा एक्सप्रेसच्या (Chakda Xpress) शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सध्या लंडनमध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. याचदरम्यान, अनुष्काला तिचा पती आणि भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची आठवण येत असून त्याच्यासाठी तिनं सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट केलीय.
अनुष्का आणि विराटच्या जोडीची चर्चा सर्वत्र रंगली आहे. दोघंही सोशल मीडियावर एकमेकांसाठी काहीतरी खास पोस्ट करत असतात. अनुष्का शर्मा तिच्या आगामी 'चकदा एक्सप्रेस' चित्रपटाच्या शूटिंगसाठी सध्या लंडनमध्ये आहे. तर, विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्यापासून खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतात आहे. नुकतीच अनुष्का शर्माने विराट कोहलीसाठी अशीच एक पोस्ट केलीय. अनुष्काची ही पोस्ट पाहून असं समजतंय की, ती सध्या विराटला खूप मिस करत आहे. अनुष्कानं इन्स्टाग्रामवर विराटसोबतचा एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये "जग अधिक उजळ, मनोरंजक आणि मजेदार दिसत जेव्हा तुम्ही एका खास व्यक्तीसह हॉटेल बायो-बबलमध्ये असतात", असं लिहिलंय.
अनुष्का शर्माची इन्स्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
चकदा एक्सप्रेस चित्रपटाची चाहत्यांमध्ये उस्तुकता
भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित चकदा एक्सप्रेस या चित्रपटांची सर्वांनाच उस्तुकता लागलीय. या चित्रपटात अनुष्का शर्मा झुलन गोस्वामीची भूमिका साकारणार आहे. प्रोसित रॉय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
विराट कोहलीची नवा लूक व्हायरल
हेअरस्टायलिस्ट राशिद सलमानी याच्याकडून विराटनं नवा हेअरकट करुन घेतला असून राशिद यानं स्वत: विराटचे नव्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. किंग कोहलीसाठी नवा लूक असंही राशिदनं फोटोंवर लिहिलं आहे. विराटचा हा नवा हेअरकटमधील लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. महत्वाचं म्हणजे, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्यापासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहिली येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेत विराट कोहलीकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)