एक्स्प्लोर
तिसऱ्या कसोटीत जाडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतून रवींद्र जाडेजाचं निलंबन करण्यात आल्याने त्याच्या जागी अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे. अक्षर पटेलने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या मालिकेत भारतीय अ संघाकडून चांगली कामगिरी केली होती.
कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत फिरकीपटू अक्षर पटेलचा समावेश करण्यात आला आहे. ऑल राऊंडर रवींद्र जाडेजाचं तिसऱ्या कसोटीसाठी निलंबन करण्यात आल्याने अक्षर पटेलला त्याच्या जागी संधी देण्यात आली.
कोलंबो कसोटीतल्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर किताबाचा मानकरी ठरलेल्या रवींद्र जाडेजावर त्याच कसोटीतल्या अखिलाडूवृत्तीसाठी आयसीसीने एका कसोटीच्या निलंबनाची कारवाई केली आहे.
श्रीलंका दौऱ्यातल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत जाडेजाला या कारवाईमुळे खेळता येणार नाही. कोलंबो कसोटीत जाडेजाने स्वत:च्या गोलंदाजीवर अडवलेला चेंडू फलंदाज करुणारत्नेच्या दिशेने अतिशय धोकादायक पद्धतीनं थ्रो केला होता.
या प्रकरणात आयसीसीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्यामुळे जाडेजाला तीन दंड गुण आणि कसोटी मानधनाच्या 50 टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला. पण गेल्या 24 महिन्यांत जाडेजाच्या बेशिस्त वर्तनासाठीच्या एकूण दंड गुणांची संख्या सहावर गेली. त्यामुळे आयसीसीच्या नियमावलीनुसार त्याच्यावर एका कसोटीतून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
जाडेजा आता कसोटीतील अव्वल ऑलराऊंडर खेळाडू!
यापुढेही जाडेजा आयसीसीच्या रडारवर राहणार!
निलंबनाच्या कारवाईनंतर जाडेजाचा फिल्मी डायलॉग
अखिलाडीवृत्तीसाठी रवींद्र जाडेजावर निलंबनाची कारवाई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement