एक्स्प्लोर
Asian Games : तिरंदाजीत भारताच्या पुरुष आणि महिला संघाला रौप्य
दक्षिण कोरियाविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात भारताच्या पुरुष आणि महिला संघांचा निसटता पराभव झाला आणि भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

जकार्ता : एशियाडमध्ये तिरंदाजीच्या सांघिक प्रकारात भारताला रुपेरी यश मिळाले आहे. भारताच्या पुरुष आणि महिला संघाने प्रत्येकी एकेक रौप्य पदक मिळवले आहे. या विजयासह आशियाई स्पर्धेत भारताच्या खात्यात दोन पदकांची भर पडली आहे. दक्षिण कोरियाविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात भारताच्या पुरुष आणि महिला संघांचा निसटता पराभव झाला आणि भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या पुरुष संघाची कामगिरी तिरंदाजीच्या सांघिक प्रकारात भारतीय पुरुष संघाचा दक्षिण कोरियाशी अटीतटीचा सामना झाला. भारतीय पुरुष संघ सामन्यात पहिल्यापासून आघाडीवर होता. सामन्यातील अखेरच्या सेटमध्ये 229-229 गुणांनी दोन्ही संघांत बरोबरी झाली. दक्षिण कोरियाच्या तिरंदाजांनी उत्तम खेळ करत लक्ष्याच्या जवळ जास्त मारा केला. पण भारतीय संघ लक्ष्याच्या जवळ मारा करण्यात अपयशी ठरला आणि याच कारणामुळे भारताला सुवर्णपदकाची संधी गमावली लागली. अखेरीस भारताला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. भारतीय महिलांच सुवर्ण पदक चार गुणांनी हुकलं भारताच्या महिलांना सांघिक तिरंदाजी प्रकारात रौप्यपदक पटकावले आहे. अवघ्या चार गुणांनी भारतीय महिलांच सुवर्ण पदक हुकलं. 231-228 गुणांच्या फरकाने भारतीय महिलांच्या हातातून सामना निसटला. मुस्कान किरार, मधुमिता कुमारी, ज्योती वेनम या तिघींनी या स्पर्धेची शानदार सुरुवात केली. पण अखेरच्या सेटमध्ये त्या मागे पडल्या. मात्र दक्षिण कोरियाच्या महिलांनी उत्तम खेळ करत सुवर्णपदकावर आपलं नावं कोरलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
मुंबई
लाईफस्टाईल
कोल्हापूर























