SL vs PAK Live Streaming: टॉपचे दोन संघ आज एकमेकांशी भिडणार; श्रीलंका-पाकिस्तान सामन्याकडं सर्वांचं लक्ष
SL vs PAK Live Streaming: या सामन्याच्या निकालाचा स्पर्धेवर कोणताही परिणाम होणार नाही. श्रीलंका आणि पाकिस्ताननं दोन्ही संघानी अंतिम फेरीतील स्थान आधीच निश्चित केलंय.
![SL vs PAK Live Streaming: टॉपचे दोन संघ आज एकमेकांशी भिडणार; श्रीलंका-पाकिस्तान सामन्याकडं सर्वांचं लक्ष SL vs PAK Live Streaming Details- When And Where To Watch Sri Lanka vs Pakistan Live In Your Country? Asia Cup 2022, Super Four Match 6 SL vs PAK Live Streaming: टॉपचे दोन संघ आज एकमेकांशी भिडणार; श्रीलंका-पाकिस्तान सामन्याकडं सर्वांचं लक्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/d64c97d6652b3645f33aa3050974fb591662714869010266_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
SL vs PAK Live Streaming: आशिया चषक 2022 च्या (Asia Cup 2022) अंतिम सामन्यापूर्वी सुपर 4 फेरीत श्रीलंका आणि पाकिस्तान (Sri Lanka vs Pakistan) आज (09 ऑगस्ट) एकमेकांशी भिडणार आहे. या सामन्याच्या निकालाचा स्पर्धेवर कोणताही परिणाम होणार नाही. श्रीलंका आणि पाकिस्ताननं दोन्ही संघानी अंतिम फेरीतील स्थान आधीच पक्क केलंय. या सामन्याच्या निकालाचा स्पर्धेवर कोणताही परिणाम होणार नाही. दोन्ही संघांना येथे अंतिम फेरीपूर्वी आपल्या खेळाडूंची चाचपणी करण्याची संधी असेल.
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान सामना कधी आणि कुठे खेळवला जाईल?
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना मंगळवारी 09 ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) खेळला जाईल.
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना किती वाजता सुरू होईल?
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर, या सामन्याच्या अर्धातास पूर्वी नाणेफेक होईल.
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील लाईव्ह सामना कुठं आणि कसं पाहू शकतात?
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्याीतील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे.
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पाहता येणार?
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार पाहता येणार आहे. याशिवाय आशिया चषकाच्या संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी https://marathi.abplive.com वर भेट देऊ शकतात.
संघ-
पाकिस्तानचा संघ
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमा, हैदर अली, हरिस रउफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, हसन अली, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर.
श्रीलंकेचा संघ
दासुन शनाका (कर्णधार), धनुष्का गुणतिलक, पाठ्यम निसंका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चरित असलंका (उप कर्णधार), बनुका राजपक्षे (विकेटकीपर), आशेन बांदरा, धनंजय डी सिल्वा, वणिंदो हसारंगा, महेश तीक्ष्णा, जेफ्री वांडरसे, प्रवीण जयवीकरण, दुष्मंता चमीरा, बिनुरा फर्नांडो, चमीका करुणारत्ने, दिलशान मदुषणका, माथीशा पथिराना, दिनेश चांदीमल (विकेटकीपर), नवनिन्दु फर्नांडो, कासुन रजिथा.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)