Asia Cup 2022: आशिया चषकाला आजपासून सुरूवात, पहिल्या सामन्यात श्रीलंका- अफगाणिस्तान आमने-सामने
Asia Cup 2022: यूएईमध्ये रंगणाऱ्या आशिया चषकाला आजपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान (Sri Lanka vs Afghanistan) यांच्यात होणार आहे.
Asia Cup 2022: यूएईमध्ये रंगणाऱ्या आशिया चषकाला आजपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान (Sri Lanka vs Afghanistan) यांच्यात होणार आहे. श्रीलंकेच्या संघाचं नेतृत्व दासून शनाका करणार आहे. तर, मोहम्मद नबीच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानचा संघ मैदानात उतरेल. टी-20 क्रिकेटच्या फॉरमेटमध्ये दोन्ही देश तब्बल सहा वर्षांनी आमने-सामने येणार आहेत. 2016 च्या टी-20 विश्वचषकादरम्यान श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंतचा एकमेव टी-20 सामना खेळला गेला होता. ज्यामध्ये श्रीलंकेने विजय मिळवला होता. परंतु, गेल्या काही वर्षांत अफगाणिस्तान संघानं दमदार खेळीच्या जोरावर क्रिडाविश्वावर छाप सोडलीय. त्यांच्यात क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये मोठा बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे संघ 'ब' गटात आहेत ज्यात बांगलादेशचाही समावेश आहे. या गटातील टॉप 2 संघ सुपर 4 साठी पात्र ठरतील.
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामना कधी आणि कुठे खेळवला जाईल?
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामना शनिवार 27 ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामना किती वाजता सुरू होईल?
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर, या सामन्याच्या अर्धातास पूर्वी नाणेफेक होईल.
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील लाईव्ह सामना कुठं आणि कसं पाहू शकतात?
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्याीतील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे.
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पाहता येणार?
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार पाहता येणार आहे. याशिवाय आशिया चषकाच्या संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी https://marathi.abplive.com वर भेट देऊ शकतात.
संघ-
श्रीलंका-
दसुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुणथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, आशेन बंडारा, धनंजया डी सिल्वा, वानंदु हसरंगा, महेश थीक्षणा, जेफरी वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, दिलशान पथिराना, नुवानीडु फर्नांडो, नुवान तुषारा, दिनेश चांदीमल.
अफगानिस्तान-
मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान, अफसर जजई, अजमतुल्लाह ओमरजई, फरीद अहमद मलिक, फजलहक फारूकी, हशमतुल्ला शाहिदी, हजरतुल्लाह जजई, इब्राहिम जादरान, करीम जनत, मुजीब उर रहमान, नजीबुल्लाह जादरान, नूर उल अहमद, रहमानुल्ला गुरबाज, राशिद खान, समीउल्लाह शिनवारी
हे देखील वाचा-