Neeraj Chopra: गोल्डन बॉय नीरज चोप्राचा नवा विक्रम; डायमंड लीग स्पर्धेत विजेतेपद पटकावत रचला इतिहास
Neeraj Chopra : भालाफेकपटू नीरजनं आपल्या स्टाईलमध्ये पुनरागमन करत ऐतिहासिक डायमंड लीग विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत त्याने 89.08 मीटर अंतरावर भाला फेकत प्रथम स्थान पटकावलं.
Neeraj Chopra in Lausanne Diamond League : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने (Neeraj Chopra) दुखापतीनंतर जोरदार पुनरागमन केलं आहे. भालाफेकपटू नीरजनं आपल्या स्टाईलमध्ये पुनरागमन करत ऐतिहासिक डायमंड लीग विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत त्याने 89.08 मीटर अंतरावर भाला फेकत प्रथम स्थान पटकावलं. नीरजनं नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2022) रौप्यपदक जिंकलं होतं. त्यावेळी त्याला कंबरेला दुखापत झाली होती.
HE'S DONE IT!🇮🇳
— Inspire Institute of Sport (@IIS_Vijayanagar) August 26, 2022
IIS athlete #NeerajChopra becomes the FIRST EVER Indian to win at the Diamond League, finishing top of the pile at the #LausanneDL with a MASSIVE throw of 89.08m in his very first attempt⚡️
He qualifies for the Diamond League final, in Zurich. #CraftingVictories pic.twitter.com/zbxbqrlWnD
नीरजनं पहिल्याच प्रयत्नात 89.08 मीटर अंतरावर भाला फेकला
नीरजनं ही स्पर्धा जिंकत आणखी एक मार्ग खुला केला आहे. हंगेरीतील बुडापेस्ट येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 साठीही तो पात्र ठरला आहे. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 89.08 मीटर अंतरावर भाला फेकला. यानंतर नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 85.18 मीटर भाला फेकला. यानंतर त्यानंतर त्यानं तिसरा थ्रो केलाच नाही. त्यानंतर चोप्राचा चौथा प्रयत्न फाऊल घोषित झाला आणि नंतर त्याने पाचव्या प्रयत्न देखील केला नाही. पहिल्या थ्रोच्या बळावर नीरजला विजयी घोषित करण्यात आलं.
ऐतिहासिक रौप्य पदक पटकावताना नीरजला झाली होती दुखापत
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2022) अंतिम फेरीत ऐतिहासिक रौप्य पदक पटकावताना नीरजला दुखापत झाली होती. यामुळं नुकत्याच झालेल्या बर्मिंगहम कॉमनवेल्थ स्पर्धेला देखील तो खेळू शकला नव्हता. नीरज चोप्राला वैद्यकीय पथकाने चार आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रानं वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक जिंकत यूएसमध्ये भारताचा तिरंगा फडकावला. या पदकासह नीरज चोप्रानं तब्बल वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील तब्बल 19 वर्षांची प्रतिक्षा संपवली. मात्र, या स्पर्धेदरम्यान मांडीला दुखापत झाल्यानं त्याला एक महिना मैदानापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे तो बर्मिंगहम येथे 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत तो खेळू शकला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या