एक्स्प्लोर
... तर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची वर्णी?
![... तर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची वर्णी? Anil Kumble Can Become Team India Director And Rahul Dravid Can Replace With Him ... तर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची वर्णी?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/12161248/anil-kumble-rahul-dravid.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेला नजिकच्या काळात टीम डायरेक्टर म्हणून बढती मिळण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीकडून बीसीसीआयच्या प्रशिक्षण पद्धतीत बदल करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
प्रशासक समितीच्या या प्रयत्नांना 14 एप्रिलपर्यंत मूर्त स्वरुप मिळालं, तर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक या नात्याने अनिल कुंबळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अखेरची जबाबदारी सांभाळताना दिसेल.
बंगळुरू कसोटीनंतर कुंबळेने बीसीसीआय प्रशासकांची भेट घेतली होती. त्यांनी कुंबळेला भारताच्या सर्व संघांविषयी एक सर्वसमावेशक अहवाल तयार करण्यासाठी सांगितलं आहे. वास्तविक कुंबळे आणि राहुल द्रविड यांनी मिळून गेल्याच वर्षी बीसीसीआयला एक दिशादर्शक अहवाल दिला होता.
पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासक समितीला बीसीसीआयचा ढाचाच बदलायचा आहे, त्यामुळे त्यांनी कुंबळेला नव्याने सर्वसमावेशक अहवाल बनवण्याची सूचना केली आहे.
अनिल कुंबळेच्या जागी राहुल द्रविड?
अनिल कुंबळेला टीम इंडियाच्या संचालकपदी बढती मिळाल्यास त्यांची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका प्रशिक्षक म्हणून अखेरची कसोटी मालिके असेल. त्यामुळे त्यांच्या जागी अंडर-19 संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांची वर्णी लागू शकते, असं बोललं जात आहे.
बीसीसीआयने कुंबळेला भारतीय क्रिकेट संघाचा अहवाल देण्यास सांगितलं आहे, त्यामध्ये ज्यूनिअर संघ आणि महिला संघाचाही समावेश आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी बीसीसीआयची कोअर कमिटी आणि भारताच्या क्रिकेट सल्लागार समितीची बैठक होणार आहे. सल्लागार समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
शिक्षण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)