एक्स्प्लोर
कोहली वि. ऑस्ट्रेलियन मीडिया : विराटच्या समर्थनार्थ बिग बी मैदानात
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात जेवढी रंगत मैदानात आहे, तेवढीच मीडियामध्येही आहे. विशेषत: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियन मीडियाच्या निशाण्यावर आहे. पण भारतीय कर्णधाराला आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं समर्थन मिळालं आहे.
अमिताभ बच्चन याचं ट्वीट
कोहलीच्या समर्थनार्थ अमिताभ बच्चन यांनी लिहिलं आहे की, "ऑस्ट्रेलियन मीडिया विराटला क्रीडाविश्वातील डोनाल्ड ट्रम्प बोलत आहे. त्याला विजेता आणि प्रेसिडेंट मानण्यासाठी आभार!
https://twitter.com/SrBachchan/status/844266813961596929
ऑस्ट्रेलियन मीडियाकडून विराट कोहलीची डोनाल्ड ट्रम्प यांच्यांशी तुलना
ऑस्ट्रेलियन मीडियाची टीका
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा क्रीडाविश्वाचा डोनाल्ड ट्रम्प बनल्याची बोचरी टीका ऑस्ट्रेलियन मीडियाने केली आहे. विराट ऑस्ट्रेलियन खेळाडूंविषयी चुकीच्या बातम्या पसरवत असल्याचा आरोपही 'द डेली टेलिग्राफ' या वृत्तपत्रातील एका लेखात करण्यात आला आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे विराट कोहलीने प्रत्येक गोष्टीसाठी मीडियाला दोषी ठरवायला सुरुवात केली आहे. मात्र भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी ऑस्ट्रेलियन मीडियाला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. "ऑस्ट्रेलियन मीडिया ऑस्ट्रेलियन संघाचा सपोर्टिंग स्टाफ आहे," असं गावसकर म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement