एक्स्प्लोर
अॅलिस्टर कूकचा कसोटी क्रिकेटला अलविदा
कसोटी क्रिकेटमध्ये अॅलिस्टर कूकने सर्वात वेगवान 10 हजार धावांचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
मुंबई : इंग्लंड क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज अॅलिस्टर कूकने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.2014 साली कूकने वन डे क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती.
सध्या इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी सामने सुरु आहेत. पाच कसोटी सामन्यातील चार कसोटी सामने पारही पडले आहेत. पाचव्या कसोटी सामन्यानंतर कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय अॅलिस्टर कूकने घेतला आहे.
भारताविरोधात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मागच्या चार सामन्यात अॅलिस्टर कूकची कामगिरी उल्लेखनीय झाली नाही. ओपनर फलंदाज म्हणून इंग्लंडला ठोस अशी सुरुवात करुन देण्यात अॅलिस्टर कूक अपयशी ठरला. चार सामन्यात केवळ 109 धावांची खेळीच कूकने केली आहे.
आता भारताविरोधातील पाचव्या कसोटी सामन्यात सर्वोत्तम खेळी करुन, अॅलिस्टर कूक कसोटी क्रिकेटला अलविदा करेल, अशी क्रिकेट चाहत्यांना आशा आहे.
अॅलिस्टर कूकची क्रिकेट कारकीर्द
अॅलिस्टर कूक इंग्लंड क्रिकेट टीममध्ये सर्वाधिक धावांची नोंद करणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. 12 वर्षांच्या कारकीर्दीत कूकने 160 कसोटी सामन्यांमध्ये 12,254 धावा आपल्या खात्यात जमा केल्या. यामध्ये 56 अर्धशतकं आणि 32 शतकांचा समावेश आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये कूकने 294 धावांची सर्वात मोठी खेळी केली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये अॅलिस्टर कूकने सर्वात वेगवान 10 हजार धावांचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
2010 साली अॅलिस्टर कूक इंग्लंड क्रिकेट टीमचा कर्णधार बनला होता. त्याच्या कर्णधार पदाच्या कारकीर्दीत इंग्लंडची टीम एकूण 59 सामने खेळली, त्यातील 24 सामने विजयी, तर 22 सामने पराभूत झाली, तर 13 सामने ड्रॉ झाले.
2016 पर्यंत अॅलिस्टर कूकने इंग्लंडचं कर्णधारपद सांभाळलं. 2016 साली कूक भारत दौऱ्यावर आला असताना, टीमची कामगिरी खूपच खराब झाली, त्यानंतर त्याने कर्णधारपद सोडून दिलं आणि ओपनर फलंदाज म्हणून टीममध्ये राहिला.
कसोटी क्रिकेटमध्ये सलग 158 सामने खेळण्याचा विश्वविक्रम अॅलिस्टर कूकच्या नावावर आहे.
2014 सालीच अॅलिस्टर कूकने वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. 33 वर्षांच्या अॅलिस्टर कूकने 92 वन डे समान्यांमध्ये 77.3 च्या स्ट्राईक रेटने 3,204 धावा केल्या, ज्यात 19 अर्धशतकं आणि 5 शतकांचा समावेश आहे.
तसेच, अॅलिस्टर कूकने इंग्लंडच्या चार टी-20 सामन्यांमध्ये 61 धावांची खेळीही केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement