अभिजीत कटकेचा मातीतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय
पुण्यात 29 आणि 30 डिसेंबरला मातीतील राष्ट्रीय कुस्ती होणार आहे. महाराष्ट्र केसरीतील कामगिरीच्या निकषांवर, विजेता बाला रफिक शेख आणि उपविजेता अभिजीत कटके यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली होती.

मुंबई : महाराष्ट्र केसरीत यंदा उपविजेता ठरलेल्या अभिजीत कटकेनं मातीतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. अभिजीतचे प्रशिक्षक अमर निंबाळकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महाराष्ट्र केसरीसारख्या मोठ्या स्पर्धेनंतर अभिजीतला विश्रांतीची गरज आहे.
गेल्या वर्षभरातील भरगच्च कार्यक्रमाचा अभिजीतवर ताण आल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच हाताच्या दुखापतीतून सावरण्यासाठीही त्याला सक्तीच्या विश्रांतीची गरज आहे. महाराष्ट्र केसरीनंतर अवघ्या सहा दिवसांत मातीतील राष्ट्रीय कुस्तीचं आयोजन करण्यात आलं आहे.
पुण्यात 29 आणि 30 डिसेंबरला मातीतील राष्ट्रीय कुस्ती होणार आहे. महाराष्ट्र केसरीतील कामगिरीच्या निकषांवर, विजेता बाला रफिक शेख आणि उपविजेता अभिजीत कटके यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली होती. मात्र अभिजीतनं या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
बुलडाण्याचा पैलवान बाला रफिक शेखनं अभिजीत कटकेचा महाराष्ट्र केसरीत पराभव केला. बालानं अभिजीतचा 11-3 असा पराभव केला. या विजयासह बाला रफिकनं पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली.
संबंधित बातमी
























