एक्स्प्लोर
कसोटीतून निवृत्तीचा विचार नाही, डिव्हिलियर्सची स्पष्टोक्ती
![कसोटीतून निवृत्तीचा विचार नाही, डिव्हिलियर्सची स्पष्टोक्ती Ab De Villiers Not To Retire From Test Cricket कसोटीतून निवृत्तीचा विचार नाही, डिव्हिलियर्सची स्पष्टोक्ती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/17181137/ab-deviliars-compressed-768x954-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने तो कसोटी क्रिकेटमधून इतक्यात निवृत्ती घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून माघार घेतल्यानं त्याच्या निवृत्तीच्या चर्चेला उधाण आलं होतं.
पण आपण केवळ त्या एकाच कसोटी मालिकेतून माघार घेतली असल्याचं डिव्हिलियर्सने म्हटलं आहे. एबी कोपराच्या दुखापतीमुळं गेले सहा महिने संघाबाहेर होता. पण 25 जानेवारीला श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यातून तो पुनरागमन करणार आहे. 2019 सालचा वन डे विश्वचषक जिंकण्याचं आपलं लक्ष्य असल्याचंही डिव्हिलियर्सनं स्पष्ट केलं आहे.
एबी डिव्हिलियर्स दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार
दरम्यान एबी डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. क्रिकेट साऊथ आफ्रिकाने त्याच्याजागी फाफ डू प्लेसिसची कर्णधारपदी निवड केली आहे. हाशिम अमलाच्या राजीनाम्यानंतर एबी डिव्हिलियर्सकडे जानेवारीमध्ये कर्णधारपदाची धुरा सोपवली होती. इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याने दक्षिण आफ्रिका संघाचं नेतृत्त्व केलं होतं. दुखापतीमुळे त्याला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर राहावं लागलं होतं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)