एक्स्प्लोर
Advertisement
संदीप पाटील यांचे ‘माझा कट्टा’वरील 25 महत्त्वाचे मुद्दे
मुंबईः टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा मनमिळावू स्वभावाचा व्यक्ती असून त्याचं कोणाशीही वैयक्तिक कसलं वैर नाही, असा खुलासा भारतीय निवड समितीचे मावळते अध्यक्ष संदीप पाटील यांनी केली आहे. संदीप पाटील यांनी ‘माझा कट्टा’वर मनमोकळ्या गप्पा मारल्या.
संदीप पाटील यांचे ‘माझा कट्टा’वरील 25 महत्त्वाचे मुद्दे :
- सचिनविषयी बोलायचं तर तोंड सांभाळून बोलावं लागतं. पण निवड समितीला कठोर निर्णय घ्यावे लागतात - संदीप पाटील
- सचिन तेंडुलकरकडे त्याच्या भविष्याविषयी पहिल्यांदा जाणून घेतलं ते 12 डिसेंबर 2012 रोजी - संदीप पाटील
- सचिननं निवृत्त होण्याचा निर्णय घेतला नसता तर निवड समितीनं त्याला ड्रॉप केलं असतं - संदीप पाटील
- धोनी कसोटी क्रिकेटमधून का निवृत्त झाला हा प्रश्न आम्हालाही पडला - संदीप पाटील
- संघासाठीचं कॉण्ट्रिब्युशन कमी झाल्याची जाणीव धोनीला झाली असावी, म्हणून त्यानं कसोटीमधून निवृत्ती घेतली असावी - संदीप पाटील
- सचिन असो किंवा अन्य कुणीही एखाद्याला डावलण्याचा निर्णय घेतला तर त्या खेळाडूला कारणं देऊनच – संदीप पाटील
- आम्ही एकट्या सचिन तेंडुलकरशीच त्याच्या भविष्याविषयी चर्चा केली. अन्य कुणाशीही नाही. - संदीप पाटील
- सचिन तेंडुलकरविषयीचा निर्णय माझ्या पत्नी आणि मुलांनाही पटलेला नाही. - संदीप पाटील
- एखाद्या खेळाडूला डावलण्याचा निर्णय झाला तर त्याच्याशी बोलण्याची पद्धत आम्ही सुरू केली. - संदीप पाटील
- मला निवड समितीकडून आलेला कटू अनुभव आजच्या पिढीला येऊ नये याचा प्रयत्न केला. - संदीप पाटील
- मला आणि कपिलला का डावललं ते ठाऊक नाही. पण तो विभागीय समतोल टाळण्याचा प्रयत्न होता. - संदीप पाटील
- महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली म्हणजे दोन टोकं. एक साऊथ पोल तर दुसरा नॉर्थ पोल- संदीप पाटील
- विराट कोहलीत गेल्या काही वर्षांत कमालीचा फरक झाला आहे आणि तोच त्याला फायद्याचा ठरला आहे. - संदीप पाटील
- 1981 साली माझ्या घरी फोनही नव्हता. माझ्या आईला माझी काळजी असल्याचं कळताच मुख्यमंत्री अंतुलेनी माझ्या घरी फोन बसवला. - संदीप पाटील
- सुनील गावस्करनं सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात फलंदाजीला बोलावलं आणि माझी कारकीर्द पुन्हा सुरू झाली - संदीप पाटील
- 1983 सालच्या विश्वचषक कामगिरीची लोकांना अजूनही आठवण आहे याचा आनंद आहे. - संदीप पाटील
- 1983 सालच्या विश्वचषक विजयाची सुरुवात पतौडी आणि अजित वाडेकर यांच्या भारतीय संघांच्या कामगिरीनं झाली. - संदीप पाटील
- भारतीय संघाच्या विंडीज दौऱ्यात विराट कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांना खूप जवळून पाहता आलं – विराट कोहली
- आजच्या पिढीला आपल्या करीअरचं नेमकं भान आहे. विराट कोहली सकाळी पाचच्या ठोक्याला उठून योगासनं सुरू करतो - संदीप पाटील
- अजिंक्य रहाणे एक होऊ घातलेला परिपक्व खेळाडू. त्यानं सचिनसारखीच धावांची भूक कायम राखावी. -संदीप पाटील
- रोहित शर्मा खूपच गुणवान. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये स्थिरावण्याची विशिष्ट सामने खेळू देण्याची गरज होती. - संदीप पाटील
- बॉब विलीसविषयी मला आदर. त्याच्या एका षटकात मी सहा चौकार मारले तो दिवस त्याच्यासाठी फुटक्या नशिबाचा. - संदीप पाटील
- केनियाचा प्रशिक्षक म्हणून माझ्या विश्वचषक कामगिरीचं मूळ मध्य प्रदेशसोबतच्या कर्णधारपदाच्या अनुभवात दडलेलं. - संदीप पाटील
- ट्वेन्टी ट्वेन्टी खेळण्याची संधी मिळाली नाही याची खंत वाटते. पण भारतासाठी खेळू शकलो याचा आनंद. - संदीप पाटील
- माझ्याकडून झालेल्या चुका आजच्या पिढीकडून होऊ नयेत. घरातली छोटी छोटी कामं करतो हे माझ्या फिटनेसचं रहस्य. - संदीप पाटील
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement