एक्स्प्लोर
151 चेंडूत 490 धावा, 20 वर्षीय फलंदाजाचं मैदानात वादळ
दक्षिण आफ्रिकेच्या एका क्लब क्रिकेटमध्ये खेळताना त्याने केवळ 151 चेंडूत 490 धावा ठोकल्या.
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या शेन डॅड्सवेल या युवा फलंदाजाने क्रिकेटमध्ये मोठा विक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एका क्लब क्रिकेटमध्ये खेळताना त्याने केवळ 151 चेंडूत 490 धावा ठोकल्या. 27 चौकार आणि 57 षटकारांनी त्याने ही खेळी सजवली.
शेन डॅड्सवेलच्या या खेळीच्या जोरावर त्याचा संघ एनडब्ल्यू पुकेने पॉच डॉर्पविरुद्ध 50 षटकांमध्ये 3 बाद 677 धावा केल्या. शेन डॅड्सवेल हा केवळ 20 वर्षांचा आहे. त्याने या वयातच हा कारनामा केला.
मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 264 धावा करण्याचा विक्रम टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने 2014 मध्ये 173 चेंडूत 264 धावा ठोकल्या होत्या. मात्र आता 50 षटकांच्या क्लब क्रिकेटमध्ये हा विक्रम मोडण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement