एक्स्प्लोर
रिसेप्शनसाठी 'विरानुष्का'चं पंतप्रधान मोदींना आमंत्रण
1/5

या कार्यक्रमानंतर विराट कोहली नव्या वर्षात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. पाच जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. तर अनुष्काही शुटिंगला सुरुवात करणार आहे.
2/5

इटलीमध्ये झालेल्या या लग्नसोहळ्याला विराट आणि अनुष्काच्या कुटुंबीयांसह काही निवडक लोकच उपस्थित होते. आता भारतात परतल्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा जंगी रिसेप्शन ठेवणार आहेत. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकाही व्हायरल झाली आहे.
3/5

21 तारखेला दिल्लीत, तर 26 तारखेला मुंबईत जंगी रिसेप्शन होणार आहे. ज्यामध्ये बॉलिवूडमधील आणि क्रिकेटमधील दिग्गज हजर असतील.
4/5

लग्नाचा कार्यक्रम हा अत्यंत खाजगी पद्धतीने करण्यात आला असला तरी भारतात रिसेप्शनचा मोठा कार्यक्रम होणार आहे.
5/5

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नानंतर 21 डिसेंबरला रिसेप्शन सोहळा होणार आहे. यासाठी दोघांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं आहे. मोदींनी विराट आणि अनुष्काला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या.
Published at : 20 Dec 2017 09:32 PM (IST)
View More























