1952 मध्ये श्रीधर यांच्याकडून एका शिक्षकाचं लांब नख चुकून तुटलं. त्यामुळे त्यांना शिक्षकाचा ओरडा खावा लागला होता. 'तुला तुटलेल्या नखाची किंमत कधीच समजणार नाही, कारण तुझी कशासोबतही बांधिलकी नाही.' त्यामुळे श्रीधर यांनी आव्हान म्हणून स्वत:ची नखं वाढवायचा निर्णय घेतला.
2/6
श्रीधर यांनी वयाच्या 16 व्या वर्षापासून नखं वाढवायला सुरुवात केली होती. डाव्या हाताची नखं त्यांनी इतक्या वर्षांत कापली नाहीत, तर उजव्या हाताची नखं ते नियमितपणे कापत होते.
3/6
श्रीधर यांच्या वाढलेल्या पाचही नखांची लांबी थोडी-थोडकी नव्हे, तर 31 फूट इतकी होती. म्हणजेच श्रीधर चिल्लाल यांच्या नखांची लांबी साधारण तीन मजली उंच इमारती इतकी झाली होती.
4/6
जगातील सर्वात लांब नखं असलेल्या पुण्यातील विक्रमवीराने अखेर बोटांना नेलकटर लावलं! 82 वर्षीय श्रीधर चिल्लाल यांनी तब्बल 66 वर्षांनंतर आपली नखं कापली आहेत.
5/6
वयोमानानुसार श्रीधर यांना नखांची निगा राखणं कठीण जात होतं. झोपतानाही त्यांना नखामुळे अडथळा येत असे. इतकंच काय, वाऱ्याची साधी झुळूकही त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत असे.
6/6
चिल्लाल यांच्या नखांचं जतन 'रिप्लेज, बिलिव्ह इट ऑर नॉट' या अमेरिकेतील संग्रहालयात करण्यात येत आहे.